शेतात काम करायला गेल्या, थकून दमून जेवायला बसताच काळ आला, नागपुरात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, 5 महिला जखमी.

 तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या. जेवण करताना दुपारी 2 च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली.कीकडे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची कामं सुरू झाली असताना रामटेक तालुक्यात दुर्दैवी घटना घडलीय. शेतात दिवसभर काम करून थकलेल्या महिलांपैकी काही जणी जेवायला बसल्या, आणि अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथे घडली.काम थांबवून जेवायला बसल्या पण मृत्यूनं गाठलं.

रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात सुमारे 25 महिला शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास काम थांबवून जेवणासाठी बसल्या असताना अचानक वीज कोसळली. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मंगलाबाई जीवन मोटघरे (रा. परसोडा, ता. रामटेक) आणि वर्षा देवचंद्र हिंगे (रा. भोजापूर, ता. रामटेक) यांचा समावेश आहे. पाच महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत. त्यामध्ये जयश्री आकाश जवादे, रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर (सर्व रा. रामाळेश्वर वॉर्ड, रामटेक), तसेच कलाबाई कवडू वरघणे आणि प्रमिला वासुदेव आष्टनकर (दोघीही रा. भोजापूर, ता. रामटेक) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. रामटेकजवळच्या सोनेघाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने ही घटना घडली. यात या दोघींचा मृत्यू झाला.ही घटना घडली त्यावेळी परिसरात पावसाचं वातावरण होतं, मात्र वीज कोसळेल असा कोणताही इशारा नव्हता. अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पावसाच्या आधीच वीज पडून दोन महिलांचा मृत्यू  झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रामटेकचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या. जेवण करताना दुपारी 2 च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.