15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री; बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल.

भंडाऱ्याच्या साकोलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अवघ्या 15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली.भंडाऱ्याच्या साकोलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अवघ्या 15 दिवसाच्या नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली. मात्र, या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर याचा दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात उघडकीस आलाय. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या साकोली इथं घडला असून भंडारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी चौकशीअंती या गंभीर प्रकरणाची तक्रार साकोली पोलीसात केली. याप्रकरणी साकोली पोलिसांनी 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्यपाल रंगारी (47), सुचिता रंगारी (44), अजित टेंभुर्णे (35), सोनाली टेंभुर्णे (25), नंदकिशोर मेश्राम (45), राकेश टेंभुर्णे (32), पुष्पलता रामटेके (50) या सात जणांविरोधात साकोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या हे बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून ते एका शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे. साकोली तालुक्यातील एका उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये एका बालकाचा जन्म झाला होता. पंधरा दिवसाचा हा बालक असताना त्याची 70 हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. मात्र, ही विक्री अवैध असल्यानं त्याचा 100  रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा करण्यात आला. आणि हे सर्व करत असतानाही प्रसुती भंडारा शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात झाल्याचं दस्तावेज तयार करून नवीन जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आलं. याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती. ही तक्रार भंडारा येथील बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांना प्राप्त होताच त्यांनी चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील नामदेव बळीराम दहीकर (35) याने भावाशी वाद करत प्राणघातक हल्ला केला.

या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी नामदेव दहीकर यास परतवाडा पोलीस तपासाकरीता घटनास्थळी गेले असता नामदेव पोलिसांना चकमा देत फरार झाला. पैशाच्या कारणावरून नामदेव दहीकर याने विलास दहीकर यांच्यावर लोखंडी पाईपने डोक्यावर प्राणघातक हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी युवकाचे वडिल बळीराम दहीकर यांच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलिसांनी नामदेव दहीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले असता आज पोलिसांनी घटनास्थळी तपासाच्या अनुषंगाने आरोपीला घेऊन गेले असता त्याने पळ काढला. पोलिस म्हसोना परिसरात आरोपी नामदेवचा शोध घेत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..