दैव बलवत्तर! एका खड्ड्यात पडला, दुसऱ्या खड्ड्यातून बाहेर आला; नागपुरातील 9 वर्षीय चिंतेशची संकटाला फाईट.

चिंतेशचा पाय घसरला व एका खड्ड्यातून तो नाल्यात पडला. पावसामुळे नाल्यातील पाण्याला प्रवाहही चांगलाच होता. त्यामुळे तो वाहून जाऊ लागला. एकच खळबळ उडाली.खेळता खेळता नऊवर्षीय मुलगा नाल्याच्या खड्ड्यात पडला. त्यात पाणी भरपूर तेथे उपस्थितांचा श्वास रोखल्या गेला. मुलगा वाहून गेल्याची ओरड सुरू झाली. थोड्याच वेळात काहीच अंतरावर असलेल्या एका खड्ड्यातून तो मुलगा बाहेर आला. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.चिंतेश विनोद लोखंडे असे या दैव बलवत्तर असलेल्या मुलाचे नाव. सध्या शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नाले आणि त्यांची उघडी तोंडे नागरिकांसाठी धोकादायक बनू लागली आहेत. त्याचाच फटका चिंतेशला बसला. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो वाठोडा परिसरातील श्रीकृष्णनगरातील आपल्या घराजवळ मित्रांसोबत खेळत होता.

काही वेळात त्याची मावशी आली. तो मावशी व मावस भावंडांसह मावशीकडे खेळायला जाऊ लागला.शहरातील अनेक भागांप्रमाणेच श्रीकृष्णनगरमधील नालाही फुटलेला आहे. इतक्यात त्याचा पाय घसरला व एका खड्ड्यातून तो नाल्यात पडला. पावसामुळे नाल्यातील पाण्याला प्रवाहही चांगलाच होता. त्यामुळे तो वाहून जाऊ लागला. एकच खळबळ उडाली. त्याचे मित्र, भावंडे व तेथे उपस्थित नागरिकांनी गलका केला.चिंतेश नाल्याच्या दुसऱ्या खड्ड्याजवळ पोहोचला. या खड्ड्याच्या बाजूला असलेल्या गवताला त्याने धरले व तो तेथे थांबला. मात्र, तो बाहेर येऊ शकत नव्हता. दरम्यान, त्याच्या मावशीने आरडाओरड करून उपस्थितांना गोळा केले. उपस्थितांनी चिंतेशला बाहेर काढले, त्याचे प्राण वाचले.

त्याला तत्काळ मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. सुदैवाने तो वाचला तसेच त्याची प्रकृतीही स्थिर असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. चिंतेशचे वडील विनोद ई-रिक्षा चालवतात तर आई रत्नमाला ही घरकामगार आहे.गेल्या आठवड्यातच कच्छीविसा परिसरात विसर्जनाच्या कृत्रिम टाकीत पडून सातवर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. आता उघडे नाले आणि खड्ड्यांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. काही वर्षांत दरवर्षी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान काही जण नाल्यातून वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीसुद्धा प्रशासन यातून धडा घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासन यात अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.