जेवणात अळ्या आणि मिक्सरचं ब्लेड; विद्यार्थ्यांना मारहाण, मोहन माळी इंटरनॅशनल शाळेवर धक्कादायक आरोप.

मुंबई आणि पुणे परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांनी पालकांकडे केलेल्या तक्रारीनुसार, शाळेत निकृष्ट जेवण दिले जाते, तक्रार केल्यास शिवीगाळ आणि मारहाण केली जातेकवठेमंकाळ तालुक्यातील अलकूड (एस) फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण आणि निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवणात आळ्या, माश्या आणि मिक्सरचे ब्लेड सापडल्याच्या तक्रारींमुळे संतप्त पालकांनी गुरुवारी शाळेत गोंधळ घालत आपल्या मुलांना ताब्यात घेतले. शाळेचे संचालक मोहन माळी यांच्याविरोधात कवठेमंकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.मुंबई आणि पुणे परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांनी पालकांकडे केलेल्या तक्रारीनुसार, शाळेत निकृष्ट जेवण दिले जाते, तक्रार केल्यास शिवीगाळ आणि मारहाण केली जाते. यामुळे गुरुवारी दुपारी 22 पालक कवठेमंकाळ येथे दाखल झाले. त्यांनी प्रथम कवठेमंकाळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांशी चर्चा केली आणि नंतर शाळेत धडक देत आपल्या मुलांना सुखरुप बाहेर काढले.

पोलिसांनी गोंधळ टाळण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता.मुंबईतील बांद्रा येथील रहिवासी विजय तुकाराम टिके यांनी आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, “माझा मुलगा विहान आठवीत शिकतो. दोन-तीन दिवसांपूर्वी पालकांची बैठक झाली, तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मुलांना रक्त येईपर्यंत मारहाण झाली. जेवणात किडे, माश्या आणि मिक्सरचे ब्लेड सापडले. पोटाचा आजार झाल्यावरही डॉक्टरांना दाखवले नाही.”या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीने विद्यार्थी आणि पालकांचे जबाब नोंदवले असून, पाच सदस्यीय समितीमार्फत वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल, अशी माहिती कवठेमंकाळ पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वास साबळे यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनीही मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना धीर देत संस्थाचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पालकांनी सांगितले की, शाळेतील ही अमानवी वागणूक आणि निकृष्ट सुविधांमुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. ही शिक्षणाची मंदिरे नसून छळछावण्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने व्यक्त केली.घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मोहन माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत शाळांमधील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन आणि समाज यांनी एकत्र येऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.