धाकट्या भावाला दारुचा नाद, घरात सतत भांडण; मोठ्या भावाने रागाच्या भरात आईबापासमोर… थरारक घटना.

प्रवीण कामधंदा करीत नव्हता. तो रोज मद्यपान करून घरात सतत भांडण करीत असे. रविवारी रात्री त्याने घरात गोंधळ घातला, त्यामुळे अनिकेतची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती.सतत मद्यपान करून कुटुंबाला त्रास देणाऱ्या लहान भावाचा मोठ्या भावाने चाकूने वार करून खून केला. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अप्पर इंदिरानगर येथे सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खून झालेल्या व्यक्तीचे नाव प्रवीण ऊर्फ ऋतिक दत्तात्रय नवले असे असून, खून केल्याप्रकरणी त्याचा भाऊ अनिकेत नवले (वय २६) याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कामधंदा करीत नव्हता.

तो रोज मद्यपान करून घरात सतत भांडण करीत असे. रविवारी रात्री त्याने घरात गोंधळ घातला, त्यामुळे अनिकेतची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती.सोमवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. या वेळी घरात आई-वडीलही उपस्थित होते. वाद विकोपाला गेल्यानंतर अनिकेतने घरातील चाकू उचलून प्रवीणच्या पोटावर वार केले. त्यामुळे प्रवीण जागीच कोसळला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा अनिकेत घरातच डोक्यावर हात ठेवून सुन्न अवस्थेत बसला होता.

पोलिसांनी प्रवीणचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून अनिकेतला ताब्यात घेतले.नवले कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. वडील बेरोजगार असून, आई धुणीभांडी करून पैसे कमावते. अनिकेत मजुरी करून घराचा खर्च भागवत होता. प्रवीणच्या वागणुकीमुळे घरात तणाव असे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.औंध येथील ब्रेमेन चौकात महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ सोमवारी (१४ जुलै) सकाळी पावणेदहाच्या सुमारास दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. विनोद चिंतामण क्षीरसागर (२९, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे (२७, रा. पौड रस्ता, कोथरूड) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मृत्यू विजेचा धक्का बसून झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..