बनियन आणि कंबरेला टॉवेल, शिवसेनेच्या संजय गायकवाडांचा आमदार निवासमध्ये मोठा राडा, कँटीनवाल्याला बदडलं.

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासामध्ये शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गायकवाड आज विधानसभेत जेवणाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती आहे.विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने अनेक आमदार हे आकाशवाणी आमदार निवासामध्ये वास्तव्यास आहेत. मात्र मंगळवारी रात्री आमदार निवासमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमधील जेवणावरून आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. संजय गायकवाड यांचे मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गायकवाडांच्या मारहाणीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. खराब जेवणामुळे इतरांच्या जिवाशी कॅन्टीनवाले खेळत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर काहींनी गायकवाड यांनी केलेली मारहाण चुकीची असल्याचं म्हणणं आहे.

आजच्या अधिवेशनामध्ये आपण जेवणाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती समजत आहे.संजय गायकवाड हे आता आमदार निवासमध्ये वास्तव्यास आहेत.रात्रीचे जेवण कन्टीनला करत होते. मात्र त्यावेळी त्यांना देण्यात आलेली डाळ ही निकृष्ठ दर्जाची असल्याने ते संतापले. जर आपण आमदार असून ते अशा प्रकारची डाळ देत असतील तर सर्वसामान्यांना कशा प्रकारे देत असतील असं संजय गायकवाड म्हणाले. सुरूवातीला ते काऊन्टरजवळ गेले आणि कॅन्टीन व्यवस्थापकाला त्यांनी बोलावलं. त्यावेळी त्याला गायकवाडांनी खराब डाळीचा वास घ्यायला लावला. तेव्हा त्यानेही डाळ खराब असल्याचं मान्य केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

त्यानंतर मात्र गायकवाडांचा पारा चांगलाच चढला.संजय गायकवाडांनी त्याला मारहाण करायसला सुरूवात केली. त्यावेळी आजू-बाजूच्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही थांबले नाहीत. त्यासोबतच फूड डिपार्टमेंटकडे ती डाळ पाठवायला सांगितली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.मी वरण भात चपातीची ऑर्डर केली होती. वरण भात खाल्ला, पहिलाच घास खाल्ला तेव्हा खराब लागला. चिंच असेल म्हणून लागत असेल. मी दुसरा घास खाल्ला तेव्हा उलटी झाली. वरणाचा वास घेतला तेव्हा निकृष्ट नाही तर सडलेलं होतं. याआधी पण त्यांनी अशा प्रकारचं जेवण देण्याचा प्रय्तन केला. मी त्यावेळी मालकाला समज दिली होती. यांच नॉन व्हेज १५ दिवसांचं असतं, सडलेलं जेवण देऊन जिवाशी खेळत आहेत. त्यामुळे माझा राग अनावर झाला, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलं आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..