विक्रम शिंदे पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी पत्नी आणि मुलाला बाजूलाही केले, मात्र त्यांना स्वतःला विजेचा जोरदार धक्का बसलाविवाहिता कपडे वाळत घालत असताना तिला विजेचा धक्का बसला. आईला शॉक लागल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी मुलगा सुहासही धावला, मात्र दोघांनाही विजेचा धक्का लागला. पत्नी आणि मुलाचे विजेच्या धक्क्याने बरे-वाईट होईल, या भीतीने पती दोघांच्या बचावासाठी धावले. यामध्ये मायलेकही जखमी झाले असले, तरी सुदैवाने बचावले आहेत, परंतु पित्याचा करुण अंत झाला. सोलापुरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विक्रम शिंदे पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी पत्नी आणि मुलाला बाजूलाही केले, मात्र त्यांना स्वतःला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले. विक्रम शिंदेंना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली आहे.इलेक्ट्रिक शॉक लागून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथे मंगळवार 8 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. विक्रम रघुनाथ शिंदे, वय 48 वर्ष, रा. बाभूळगाव, ता. बार्शी, असे मरण पावलेल्या शेतमजुराचे नाव आहे.










