अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूनंतरही 6 महिने भावजयचा फोटो लावत लाटलं मानधन, मंत्री आदिती तटकरेंची मोठी कारवाई.

दुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एका अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही सहा महिने पगार काढण्यात आला. या प्रकरणी एका आमदाराने आवाज उठवला. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आहे. या घटनेमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अक्कलकुवा तालुक्यातील बाबा नगर येथील अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या मदतनीस मेल्यानंतरही सहा महिने पगार देण्यात आला. याबाबत एका आमदाराने मागणी करून ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांनीही संताप व्यक्त करीत सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदिती तटकरे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसले.

याप्रकारे दोघाधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.शिंदे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. त्यात त्यांनी सांगितले की, नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील एका अंगणवाडी केंद्रावर १ सप्टेंबर १९९६ मध्ये ५० रुपये मानधनावर पहिली नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ७४० रुपये मानधनावर २८ जून २००६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दुसरी नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी शांता जयंतीलाल तडवी या सेवेत असतांना दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले होते.शांता तडवी यांच्या निधनानंतर बाबानगर अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांनी संगनमत करुन त्यांना मृत न दाखविता त्यांच्या जागी त्यांच्या नावावर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवून त्या महिलेचा फोटो लावून महिलेच्या बँक खात्यावर मानधन जमा करुन काढुन घेतले.

मृत महिलेच्या मृत्यूनंतरही सहा महिन्याचे मानधन देण्यात आलं. शांता तडवी हिची भावजय सुमित्रा तडवी हिने अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी मिळविली, त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही आमदाराची तक्रारीची दोन महिने झाल्यानंतर ही दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांच्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला संबंधितांवर कारवाईची मागणी यावेळी आमश्या पाडवी यांनी केली.शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी भाजपचे हरीश पिंपळे, सुरेश धस आणि स्वतः आमश्या पाडवी यांनी प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली.नोकरी मिळविली, हा गैरप्रकार होण्यास हे दोन अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा असे ते म्हणाले. यावेळी सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदिती तटकरे यांना घेतल्याचे चित्र दिसले.यावेळी स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित केल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.