मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, कर्कटक विद्यार्थिनीसाठी ठरले शस्त्र.

ठाण्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिने स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणात तपास हा सुरू आहे.अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नातील रिक्षाचालकास ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. असगर अली शाबीर अली शेख (वय 35) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फातिमा नगर परिसरात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन तरुणी बुधवार 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली असता रिक्षा रामनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील शाळेजवळ आली असता विद्यार्थिनीने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितले.

विद्यार्थिनीने रिक्षा चालकाला थांबण्यास सांगितल्यानंतरही तो थांबला नाही आणि पुढे घेऊन जात त्याने मुलीशी जबरदस्ती केली. त्यावेळी प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने स्कूल बॅगमधील कंपास पेटीमध्ये असलेले कर्कटकने रिक्षावाल्यास मारून शेजारील बसलेल्या त्याच्या साथीदारास धक्का मारून रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेत विद्यार्थिनी शाळेत पोहचली. त्यानंतर घरी आल्यावर तिने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला.शुक्रवारी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षाचालक व त्याचा साथीदार अशा दोघांविरोधात भान्यासं कलम 137 (2), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यार्थिनीने दिलेल्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला होता. त्यातच गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 13 जुलै रोजी फातिमानगर येथे सापळा रचून रिक्षा चालकास ताब्यात घेऊन अटक केली

असून रिक्षा चालक त्याच परिसरात राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे.दरम्यान रिक्षा चालकास 14 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तर रिक्षा चालकाने सदर अपहरणाचा प्रयत्न का व कशासाठी केला ? याबाबत पोलिस तपास करत आहेत. तसेच त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत स्वत:ची सुटका करून घेतली. पोलीस आता या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अजून काही खुलासे होऊ शकतात? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.