देवरे विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना वकृत्व स्पर्धा व स्वच्छता अभियानाद्वारे अभिवादन

देवरे विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना वकृत्व स्पर्धा व स्वच्छता अभियानाद्वारे अभिवादन

नंदुरबार :तालुक्यातील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या,श्री आप्पासाहेब आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयाकडून म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेंचे पुजन करण्यात आले.’स्वच्छता काळाची गरज’ विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.त्यात प्रथम जितेंद्र पाटील,तनुषा पाटील द्वितीय, रुपेश पाटील व भुमिका मराठे तृतीय क्रमांकाने तर कार्तिका साळुंके उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी ठरली. महात्मा गांधींच्या वेशभूषेत जयेश खंडू मराठे व लालबहादूर शास्त्रींच्या वेशभूषेत वरुण पाटील यांनी ग्राम स्वच्छता करून पालक व ग्रामस्थांचे लक्ष वेधले.विद्यार्थी,शिक्षक, पालकांनी चौका-चौकात साफसफाई करत विविध घोषवाक्यांच्या गजरात स्वच्छता रॅली काढण्यात आली.

विखरण येथील जेष्ठ नागरिक तुमडू मराठे,गोविंदा साळुंके, सरपंच प्रतिनिधी रोहिदास साळुंके,खूशाल पाटील,फत्तु नाईक,मन्सुरी टेलर व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे वक्ते सी.व्ही.नांद्रे यांनी म.गांधीजींच्या जीवन कार्याचा परिचय मांडला. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकर्तुत्वाची माहिती सांगताना शास्त्रीजींच्या ‘मुर्ती लहान,पण कीर्ती महान’ उक्तीप्रमाणे तत्कालीन विविध प्रसंगांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. भारती तर आभार एम डी नेरकर यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजनासाठी वाय.डी.बागुल, आर.आर.बागुल, व्ही. बी.अहीरे, एस.एच.गायकवाड,एम.एस.
मराठे , एस.जी. पाटील, एच.एम.खैरणार यांनी परिश्रम घेतले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.