महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती; केंद्राकडून मिळाला IAS दर्जा.

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्रातील महसूल (Revenue) विभागातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. त्यामुळे, हे 12 अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत.

मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे, असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.  महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून, महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही बावनकुळे यांनी या पदोन्नतीनंतर ट्विट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती होय, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर या 12 नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

खालील अधिकाऱ्यांना मिळाली IAS पदोन्नती विजयसिंह देशमुख  ,विजय भाकरे ,त्रिगुण कुलकर्णी  ,गजानन पाटील ,महेश पाटील ,पंकज देवरे ,मंजिरी मनोलकर ,आशा पठाण ,राजलक्ष्मी शहा ,सोनाली मुळे ,गजेंद्र बावणे ,प्रतिभा इंगळे,  अशी आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.