आमदार शिवाजी पाटील अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावेळी महामार्गाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पाटील यांनी टीका केली.शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून व्हावा म्हणून शेतकरी आपले सात बारा उतारे घेऊन महामार्ग समर्थनासाठी काढलेल्या पदयात्रेत सहभागी झाले. गडहिंग्लज शहरात ही पदयात्रा काढण्यात आली. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी प्रशासनाला पत्र दिलं होतं. यानंतर चारच दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन झाले. मात्र, आज हजारो शेतकरी आपले सातबारा उतारे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी करण्यात आली.










