देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे कंपॉसबॉक्स वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न:शैलजा चौधरी ,कमामाकर चौधरी यांचे दातृत्व .

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे कंपॉसबॉक्स वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न:शैलजा चौधरी ,कमामाकर चौधरी यांचे दातृत्व .विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केवळ पुस्तकेच नव्हे, तर आवश्यक शैक्षणिक साहित्यही तितकेच महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे साहित्य वेळेवर उपलब्ध होणे, त्यांचा आत्मविश्वास आणि अभ्यासाची गती दोन्ही वाढवते. सामाजिक जाणिवेने प्रेरित होऊन जर दातृत्वातून विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होत असतील, तर ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरते. अशाच हेतूने डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे एक उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला कंपॉसबॉक्स वाटप सोहळा. थोरगव्हाण विद्यालयात कंपॉसबॉक्स वाटप सोहळा उत्साहात पार पडला थोरगव्हाण (ता. रावेर) – डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे दिनांक १४ जुलै २०२५ रोजी इयत्ता ५ वीच्या सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांना मोफत Camlin कंपॉसबॉक्स वाटप करण्यात आले. प्रा. कमलाकर त्र्यंबक चौधरी व  शैलजा कमलाकर चौधरी यांच्या दातृत्वातून व प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त प्राध्यापक तथा संस्था संचालक प्रा. कमलाकर त्र्यंबक चौधरी यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका  शैलजा कमलाकर चौधरी उपस्थित होत्या.मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचे स्वागत केले. युवराज कुरकुरे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.एकूण ९० लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते Camlin कंपनीचे कंपॉसबॉक्स सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.प्रमुख पाहुण्या शैलजा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “कंपॉसबॉक्ससारख्या शैक्षणिक साधनांचा उपयोग गणित, विज्ञान, व चित्रकलेच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून अभ्यास पूर्ण करावा.”

अध्यक्षीय भाषणात प्रा. कमलाकर चौधरी म्हणाले, “संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी सदैव तत्पर असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थी प्रेरणा घेतात. कठीण परिश्रम करून शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश मिळवावे.”कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन एस. बी. सपकाळे यांनी केले तर  जयश्री प्रविण चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला इयत्ता ५ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.