कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ का केले? देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितलं.

 कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ असे करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.‘दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलाला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक यांचे नाव देण्यात आले होते. परंतु इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप लादण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील अशा काळ्या खुणा पुसण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ असे केले आहे’, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले.दक्षिण मुंबईत मशीद रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला आणि पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले आहे.

या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी १० वाजता झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वपूर्ण आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम मुंबई महापालिकेने नियोजित कालावधीपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर केल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे पत्राद्वारे नामांतराचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला महापालिकेने मान्यता दिली.

हा पूल वाहतुकीस अनुकूल असून यामुळे मुंबईतील वाहतूक सुलभ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.लोकार्पण सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, कौशल्य व रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते आदी मान्यवर उपस्थित होते. पूल उभारणी कामात उल्लेखनीय काम केल्याबद्दल यावेळी महापालिका प्रमुख अभियंत्यांसह अन्य अभियंत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.