एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत, शहांची भेट; श्रीकांत शिंदेंना खरंच ITची नोटीस? अखेर सत्य समोर.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा संजय शिरसाट यांनी केली, पण नंतर त्यांनी घूमजाव केले. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदेंना कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही.मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा काल रंगली. विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री आणि शिंदे यांचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनीच श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं विधान केलं. पण त्यानंतर काही वेळातच त्यांनी घूमजाव केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारमधील सुत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे तीन टर्मचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं विधान शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. संजय शिरसाट यांनादेखील प्राप्तिकर विभागाची नोटीस आलेली आहे. खुद्द शिरसाट यांनीच ही माहिती दिलेली आहे. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं विधान शिरसाट यांनी केल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं. पण सरकारमधील सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागानं कोणतीही नोटीस बजावलेली नाही.प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या अर्जांच्या छाननीसाठी सीएएसएसचा (कॉम्प्युटर असिस्टेड स्क्रुटिनी सिलेक्शन) वापर करण्यात आलेला आहे. ‘सीएएसएसमधून होणारी अर्जांची छाननी पूर्णपणे कॉम्प्युटरवर आधारित असते. त्यात मानवी हस्तक्षेप नसतो. आधीच निश्चित करण्यात आलेले जोखीमांचे मापदंड लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाकडून नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत,’ अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना त्यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं सांगितलं. २०१९ ते २०२४ या कालावधीत झालेल्या संपत्तीच्या वाढीबद्दल प्राप्तिकर विभागानं स्पष्टीकरण मागितलं असल्याचं शिरसाट म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचं शिरसाट म्हणाले होते. पण त्यानंतर त्यांनी यावरुन यूटर्न घेतला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री तडकाफडकी दिल्लीला गेले होते. काल ते राज्यात परतले. शिंदेंनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शिरसाट यांना आलेली नोटीस, हिंदी भाषा सक्तीवरुन राज्यात पेटलेलं रान, त्यामुळे शिवसेनेची झालेली गोची, ठाकरे बंधूंची संभाव्य युती या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शहांची भेट घेतली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.