मोठी बातमी! संजय गायकवाड यांच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी.

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ठ दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत कॅन्टीनमध्ये मोठा गोंधळ घातला होता. संजय गायकवाड यांनी यावेळी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण देखील केली होती. संबंधित घटना ही दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पडलेले बघायला मिळाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत या घटनेचा उल्लेख करत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर सभागृहात भूमिका मांडली होती. तसेच आमदारांना सामाजिक भान असणं आवश्यक असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. या घटनेप्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे.शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवडचे युवक अध्यक्षांनी पोलिसात तक्रार केली आहे. चेतन पवार या अर्जदाराने संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.दरम्यान, संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. माझा मार्ग चुकीचा होता हे मान्य आहे. पण मराठी माणासासाठी हा मार्ग घ्यावा लागला, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलं आहे. दोषी ठरलो तर कुठल्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहे, असंदेखील संजय गायकवाड म्हणाले आहेत. तसेच आपल्याला विरोध करणाऱ्यांना दाक्षिणात्यांचा पुळका का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.