समरजीतसिंह घाटगे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे तसेच एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कागल विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर अज्ञातवासात असलेल्या समरजित यांनी पुन्हा एकदा घरवापसीची तयारी केली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. समरजीतसिंह घाटगे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट घरवापसीसाठी आहे की अन्य वैयक्तिक कामांसाठी होती याबाबत स्पष्टता आलेली नाही.










