शिंदे गटाच्या मंत्र्याला जबर धक्का; संजय शिरसाटांना थेट आयकर विभागाची नोटीस, जाहीर कार्यक्रमातच…

मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली असून, आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली आहे. शिरसाट यांच्या संपत्तीची चौकशी होणार आहे. व्हिटस् हॉटेल प्रकरणात त्यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आली आहेत. ज्यामुळे विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात गदारोळ केला होता.छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेल प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. शिरसाटांना थेट आयकर विभागाची नोटीस आल्याने हा मोठा धक्काच शिंदे गटाला म्हणावा लागेल. स्वत: एका जाहीर कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी कबूली दिली की, त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. आता आयकर विभागाकडून शिरसाटांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाईल. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर आयकर विभागाने ही कारवाई केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिरसाटांची देखील या प्रकरणी त्यांच्या संपत्तीबद्दल चौकशी होण्याची शक्यता आहे.

संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, पैसे कमावणे सोपं आहे. मात्र, ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचेही त्यांनी म्हटले. 2019 च्या निवडणुकीत त्यांची संपत्ती किती होती आणि 2024 मध्ये ती किती वाढली. या संदर्भात त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या व्हिटस् हॉटेलच्या लिलावावरून संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर आरोप करण्यात आले होते.व्हिटस् हॉटेल हे छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध हॉटेल असून तिथे सर्व सुविधा आहेत. रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ हे हॉटेल आहे.

हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ती केवळ 67 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप होता. या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली होती. विरोधकांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात लावून धरला होता. यावर जोरदार चर्चा देखील झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली.त्यामध्येच आता संजय शिरसाट यांना थेट आयकर विभागाची नोटीस आली. संजय शिरसाटांवर व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप झाली. आता संजय शिरसाट चाैकशीमध्ये काय खुलासे करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. या सगळ्याचा महायुतीमधील अंतर्गत संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.