पुण्यातून दत्तक घेतलं, तळहाताच्या फोडासारखं जपलं; 12 व्या वर्षी हृदयद्रावक अंत, आईचा हंबरडा.

आई धाकट्या मुलाला ट्यूशनला सोडायला गेली. यावेळी हार्दिक शेजारी खेळायला गेला. तिथे छताला लावलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्याला लागलाखेळता खेळता दोरीचा गळफास बसल्याने 12 वर्षांच्या मुलाला प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात विद्यानगरमध्ये हा प्रकार घडला आहे. हार्दिक अहिरे असे मयत मुलाचे नाव आहे. आईने त्याला बघताच एकच आक्रोश केला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हार्दिक हा अहिरे दाम्पत्याचा दत्तक मुलगा होता.प्रदीपकुमार अहिरे हे विद्यानगरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. ते जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी 2015 मध्ये हार्दिकला दत्तक घेतले होते.

हार्दिक 9 महिन्यांचा होता तेव्हा त्याला पुण्यातून आणले होते.सोमवारी दुपारी 3 वाजता हार्दिक शाळेतून घरी आला. त्याने चहा-बिस्किटे खाल्ली. त्याची आई धाकट्या मुलाला ट्यूशनला सोडायला गेली. यावेळी हार्दिक शेजारी खेळायला गेला. तिथे छताला लावलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्याला लागला. त्यावेळी घरात कोणी नव्हते.हार्दिकला एका महिलेने पाहिले आणि आरडाओरड केली. हार्दिकच्या आईला समजताच ती धावत आली आणि पाहून तिने एकच आक्रोश केला. हार्दिकला लगेच रुग्णालयात नेले. परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोक पसरला आहे.” खेळता खेळता एका निष्पाप चिमुकल्याचा असा करुण अंत झाल्याने विद्यानगर परिसरात शोककळा पसरली आहे,” असे लोक म्हणत होते.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील भोर येथे कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उबेद रजा शेख, वय 10 वर्ष, अहेमद राजा शेख, वय 13 वर्ष, रा. गल्ली नंबर तीन, व्हॅल्यू स्कूलजवळ, कोंढवा खुर्द, साईबाबानगर, पुणे, अशी मृतांची नावे आहेत, तर अलिशा काशिम शेख, वय 21 वर्ष, इनाया काशिम शेख, वय एक वर्ष, बिलाला, वय आठ वर्ष अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास पुणे सातारा हायवेवर शिंदेवाडी हद्दीत रामदाऱ्याजवळ घडली. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद जयवंतराव कुलकर्णी असे आरोपीचे नाव आहे. काशीम हुसेन शेख यांनी फिर्याद दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.