भयंकर! जादूटोण्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील ५ जणांना जाळले, गावात तणावपूर्ण शांतता; प्रकरणाचे गूढ उकलणार?

 बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना जीवंत जाळण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना जीवंत जाळण्यात आले आहे. खरंतर ओरांव जातीच्या पाच लोकांना आधी क्रूरपणे मारहाण करण्यात आली आणि नंतर जादूटोणा असल्याचा आरोप करून त्यांना जाळण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री ही भयंकर घटना घडली आहे.वृत्तानुसार, तेतमा गावात ही घटना घडली. एका १६ वर्षीय मुलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पूर्णियाचे डीआयजी प्रमोद कुमार मंडल म्हणाले की, ‘प्राथमिक तपासात असे दिसून आले की, तेतमा गावातील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली.

त्यानंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह झुडपात जाळले.’ असे यांनी सांगितले.पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सदर उपविभागातील तेतमा गावात घडली. सोनू कुमार या कुटुंबातील एकमेव बचावलेल्या १६ वर्षीय मुलाने सोमवारी सकाळी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एसपी, एसडीपीओ आणि पोलिस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले. सोनूने चार मारेकऱ्यांची नावेही पोलिसांना सांगितली आहेत. पोलिसांनी संपूर्ण गावात शोध मोहीम सुरू केली. असे सांगण्यात येते की, क्रूर हत्येनंतर मृतदेह कुठेतरी लपवण्यात आले आहेत, ज्यांचे FSL टीमच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे.गावातील एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यामुळे ही हल्ल्याची घटना घडली, असा पोलिसांचा अंदाज आहे. असे म्हटले जात आहे की, रामदेव ओरांव यांच्या मुलाचा मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला होता. ते जादूटोणा करत होते, असा समज निर्माण झाल्याने त्यांची हत्या करण्यात आली,’ असे एसडीपीओ पंकज कुमार शर्मा यांनी सांगितले.बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत म्हटले, ‘पूर्णियामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळण्यात आले, डीके टॅक्समुळे बिहारमध्ये अराजकता शिगेला पोहोचली आहे, डीजीपी/सीएस हतबल आहेत, कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. काल परवा सिवानमध्ये तीन लोकांची हत्या करण्यात आली. अलीकडच्या दिवसांत, बक्सरमध्ये तीन जणांची हत्या झाली. भोजपूरमध्ये तीन जण मारले गेले. गुन्हेगार सतर्क आहेत, मुख्यमंत्र्‍यांना याची कल्पना नाही. भ्रष्ट भूजा पार्टी वाढत आहे, पोलीस पराभूत झाले आहेत! डीके मजा करत आहेत कारण डीके हेच खरे बॉस आहेत.’पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. गावातील लोकांची चौकशी केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.