चिंब पावसानं आबादानी ! नाशिकमधील सात धरणे ‘ओव्हरफ्लो’; विसर्ग सुरु असूनही पाणीसाठा ६३ टक्क्यांवर.

जिल्ह्यावर पावसाची कृपावृष्टी झाली पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत तीन धरण समूहांमधील आळंदी, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही सात धरणे भरून वाहू लागली आहेत.वरुणराजा जिल्ह्यावर मेहेरबान झाला असून, पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत तीन धरण समूहांमधील आळंदी, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तब्बल १४ धरणांमधून विसर्ग सुरू असूनही धरणांमधील एकूण पाणीसाठा ६२.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.पावसाचा हंगाम सुरू होऊन सव्वा महिना झाला आहे. जूनमध्ये सरासरीच्या १२६ टक्के पाऊस झाला.

जुलैमध्ये देखील सुरुवातीपासूनच पावसाचा चांगला जोर पहायला मिळत आहे. विशेषत: पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूहामधील सात धरणे १०० टक्के भरली आहेत. ही धरणे ओव्हरफ्लो झाली असून त्यांमधून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. पहिल्या सव्वा महिन्यांतच ही धरणे काठोकाठ भरली असून, अजून किमान पावणेतीन महिने पावसाळा सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदा धरणांमधून जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर विसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गंगापूर आणि पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला.

त्यामुळे या धरण समूहांमधील गंगापूर, काश्यपी, आळंदी, पालखेड, पुणेगाव, दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा या धरणांमधून नांदूर मध्यमेश्वरमार्गे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल सहा टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली. आतापर्यंत २० हजार ८२२ दशलक्ष घनफूट म्हणजेच तब्बल २१ टीएमसी पाणी वहनमार्गाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाकडे गेल्याची माहिती प्रशासनाने दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.