‘मराठी लोकांकडे काय आहे? आमच्याच पैशांवर जगताय’; भाजप खासदार निशिकांत दुबेंचे वादग्रस्त विधान, वाद पेटणार.

मीरा रोड येथे मराठी न बोलल्याने एका दुकानदाराला मारहाण झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मीरा-भाईंदरमधील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला मारहाण करण्यात आली. मराठी न बोलल्याने ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा निषेध म्हणून संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आणि मोर्चा काढण्यात आला.

या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर अनेकांकडून टीका केली जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील व्यापाऱ्यांना अशाप्रकारे मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटले. आम्ही परत सांगतो आणि छातीठोकपणे सांगतो की, महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुम्हाला मराठी बोलावी लागेल, असे मनसेने म्हटले आहे.आता याच वादावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोठे विधान केले आहे. निशिकांत दुबे म्हणाले, हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा. ठाकरे बंधूंना हे आव्हान त्यांनी दिले आहे. हिंदी भाषिकाला मारहाण होणाऱ्या व्हिडीओनंतर त्यांनी हे भाष्य केले. फक्त हेच नाही तर त्यांनी म्हटले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मतांसाठी राजकारण करत आहेत. तुम्ही काय म्हणत आहेत मराठी बोलले पाहिजे? तुम्ही आमच्या पैशांवर खात आहात. हिंदी भाषिकांप्रमाणेच उर्दू भाषिकांना पण मारा.मुळात म्हणजे तुम्ही आमच्याच पैशांवर जगत आहात, तुमच्याकडे काय आहे?. तुम्ही हे असे मुर्खपणासारखे वागत आहात. चला मग तुम्ही तेलंगणात, बिहारमध्ये तिथे तुम्हाला मारू, हे असे चालणार नाही. आम्ही मराठीचा सन्मान करतो, मराठी एक आदर्श भाषा आहे. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांचा सर्वांचा आम्ही सन्मान करतो. आता मुंबई पालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे.जर त्यांच्यामध्ये हिंमत आहे तर त्यांच्याच बाजूला माहिम परिसर आहे. तिथे जाणून हिंदी भाषिक किंवा उर्दू भाषिकांला मराठी बोलण्यास लावावे, तेव्हा मी म्हणेल की, खरोखरच बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही वारसदार आहात. आता खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे. तुम्ही आमच्या पैशांवर जगत असल्याचे थेट त्यांनी म्हटले. आता उद्या मीरा रोड परिसरात मराठी एकीकरण समितीकडून मोर्चा हा काढला जाणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.