होय, मी पाकचा विश्वासू एजंट, 26/11चा हल्ला झाला तेव्हा…; मास्टरमाईंड तहव्वूर राणाची कबुली.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणानं NIA च्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा एजंट असल्याचं कबूल करत, हेडलीच्या मदतीने मुंबईत ऑफिस उघडल्याची माहिती दिली.मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणानं चौकशीत अनेक धक्कादायक कबुली जबाब दिले आहेत. एनआयएच्या ताब्यात असलेल्या राणाची चौकशी मुंबई क्राइम ब्रांचकडून सुरु आहे.

त्यात त्यानं महत्त्वाची माहिती दिली आहे. राणा मूळचा पाकिस्तानी असून तो कॅनडाचा रहिवासी आहे. एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेनं त्याला भारताच्या ताब्यात दिलं.आपण पाकिस्तानी सैन्याचे विश्वासू एजंट होतो. आखाती युद्धादरम्यान सौदी अरेबियात तैनात होतो, अशी माहिती राणानं चौकशीत दिली आहे. ‘सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीनं लष्कर ए तय्यबासोबत अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग घेतला होता. तो मुख्य रुपानं एका हेरांच्या नेटवर्कमध्ये काम करायचा,’ असं राणानं क्राइम ब्रांचला सांगितलं. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं राणाचा जबाब नोंदवलेला आहे. राणानं त्याच्या इमिग्रेशन बिझनेसच्या माध्यमातून हेडलीला मुंबईत एक बोगस कार्यालय उघडून देण्यास मदत केली होती. त्या कार्यालयाचा वापर हल्ल्याचा कट रचण्यासाठी वापरला गेला.आपण पाकिस्तानी सैन्याचे विश्वासू एजंट होतो. आखाती युद्धादरम्यान सौदी अरेबियात तैनात होतो, अशी माहिती राणानं चौकशीत दिली आहे. ‘सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीनं लष्कर ए तय्यबासोबत अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभाग घेतला होता. तो मुख्य रुपानं एका हेरांच्या नेटवर्कमध्ये काम करायचा,’ असं राणानं क्राइम ब्रांचला सांगितलं. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं राणाचा जबाब नोंदवलेला आहे. राणानं त्याच्या इमिग्रेशन बिझनेसच्या माध्यमातून हेडलीला मुंबईत एक बोगस कार्यालय उघडून देण्यास मदत केली होती. त्या कार्यालयाचा वापर हल्ल्याचा कट रचण्यासाठी वापरला गेला.दिल्लीसह अन्य शहरांनाही लक्ष्य करण्याची योजना होती. राणाच्या चौकशीतून हल्ल्यामागील व्यापक कटाचा उलगडा होऊ शकतो, असं एनआयएच्या विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. राणाच्या प्रत्यार्पणामुळे २६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होईल. त्याची कबुली मुंबईवरील हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाचा पर्दाफाश करण्यासाठी महत्त्वाचा असेल, असा विश्वास माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा जीव गेला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.