रुग्णालयात घुसून BFचे विद्यार्थिनीवर वार; स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न, तितक्यात…

मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. संध्या चौधरी नावाच्या तरुणीवर अभिषेक कोष्टीने चाकूनं वार केले. ती जिल्हा रुग्णालयात नर्सिंगचं प्रशिक्षण घेत होती.भोपाळ: मध्य प्रदेशच्या एका सरकारी रुग्णालयात नर्सिंगचं प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानं हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या रुग्णालयात कित्येकांच्या डोळ्यांदेखत घडली. प्रियकरानं विद्यार्थिनीचा गळा चिरला. यावेळी आसपास अनेक जण होते. पण कोणीही विद्यार्थिनीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही.

घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.घटना मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील जिल्हा रुग्णालयात घडली आहे. अभिषेक कोष्टी असं अटक करण्यात आलेलं तरुणाचं नाव आहे. अभिषेकनं त्याची प्रेयसी संध्या चौधरीची गळा चिरुन हत्या केली. दोघांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २७ जूनला संध्याचं रुग्णालयात व्होकेशनल ट्रेनिंग सुरु होतं. ती रुग्णांची देखभाल करण्यास व्यग्र होती. तितक्यात अभिषेकनं आपत्कालीन विभागात येऊन तिच्यावर चाकूनं वार केले.यानंतर आरोपीनं रुग्णालयात सर्वांसमोर संध्याचा गळा चिरला. यानंतर तो काही वेळ तिथे थांबला. त्यानं त्याच चाकूनं स्वत:चा गळा कापण्याचा प्रयत्न केला. तितक्यात त्याला संध्याचा श्वास सुरु असल्याचं लक्षात आलं. मग त्यानं संध्याच्या गळ्यावर पुन्हा वार केले. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयात असलेल्या एकानं मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.संध्याच्या हत्येचा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. त्यात अभिषेक तिच्यावर धारदार चाकूनं वार करताना दिसत आहे. अभिषेक वार करत असताना संध्याच्या मदतीला कोणीही गेलं नाही. हत्या केल्यानंतर अभिषेक तिथून निघून गेला आणि फरार झाला. हत्येनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. संध्याचा काही मिनिटांतच मृत्यू झाला.अभिषेक आणि संध्या यांचे प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद वाढले होते. त्यामुळे संबंध बिघडले, अशी माहिती नरसिंहपूरचे पोलीस अधीक्षक मृगाखी डेका यांनी दिली. ‘रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात हत्येचा प्रकार घडला. आरोपीनं तरुणीवर हल्ला केला. तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे,’ असं डेका यांनी सांगितलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.