ऑपरेशन सिंदूरनंतर घाबरला मसूद अजहर; पाकिस्तानातून काढला पळ आणि थेट गाठला हा देश…

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त झाले. मसूद अजहरच्या जवळच्या लोकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मसूद अजहर आपला भाऊ मौलाना तल्हा आसिफसोबत अफगाणिस्तानमध्ये लपला आहे.पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. दहशतवाद्यांनी स्थळे भारताकडून उद्धवस्थ करण्यात आली.

यादरम्यान पाकिस्तानमधील काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रांचे मोठे नुकसान केले. भारताच्या या हल्ल्यात मसूद अजहर याच्याजवळच्या लोकांचा जीव गेला. आता मसूद अजहर मृत्यूच्या भीतीने सैरावैरा धावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या आपला भाऊ मौलाना तल्हा आसिफ याला सोबत घेऊन अफगाणिस्तानमध्ये लपला आहे. भारताच्या कारवाईचा त्याने चांगलाच धसका घेतल्याची माहिती मिळत आहे.भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, मसूद अजहरला भीती आहे की, भारतीय एजन्सी पुन्हा एकदा दहशतवादी ठिकाण्यांवर मोठा हल्ला करू शकतात. यामुळे जीव वाचवण्यासाठी तो पाकिस्तान सोडून थेट अफगाणिस्तानमध्ये लपून बसला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या कारवाईत त्याचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात मारले गेले आणि तो स्वत: थोडक्यात बचावला. पाकिस्तानमध्ये बसून भारताच्या विरोधात षडयंत्र मसूद अजहर हा मागील काही वर्षांपासून रचत आहे.जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद अजहर आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे स्पष्ट झाले. माहितीनुसार, सध्या मसूद अजहर हा अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील गुरबुज जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये लपला आहे. अजहर हा जरी अफगानिस्तानमध्ये असला तरीही त्याला कराचीमध्ये उपचारासाठी जावे लागले. मसूद अजहरला हृदयविकारासंबंधित आजार आहे. आता मसूद अजहरला देखील समजले आहे की, भारत फक्त चेतावणी देत नाही तर थेट कारवाई देखील करतो.तालिबान सरकार उघडपणे सांगते की ते कोणत्याही दहशतवादी संघटनेला आश्रय देत नाही. मात्र, जुन्या संबंधांमुळे सध्या तालिबानचे कमांडर त्याला मदत करत आहेत. भारतीय गुप्तचर संस्था ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कधीही थेट दहशतवाद्यांचे अड्डे उडवू शकते, अशी भीती दहशतवाद्यांच्या मनात आहे. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडले नाहीत. भारताकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेले नाहीये.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.