आई-वडील पंढरीच्या वारीला अन् लेकासोबत भयंकर घडलं, 33 वर्षांच्या मुलाची बॉडी बघून अख्खं गाव हळहळलं, काय घडलं?

सुरेशचे आई-वडील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला दिंडीत गेले होते. ते गेवराई तालुक्यात पोहोचले असताना, त्यांना मुलाच्या अपहरणाची बातमी मिळाली. ते तातडीने घरी परतले. मात्र, घरी आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह पाहून मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 33 वर्षीय तरुणाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. सुरेश अर्दाड असे या तरुणाचे नाव आहे. वाळू माफियांना, सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. त्यामुळेच गावातील काही तरुणांनी त्याचे अपहरण केले. नंतर विदर्भात त्याचा मृतदेह फेकून दिला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सुरेश अर्दाड घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी या गावचा रहिवासी होता. त्याचे गावातील लोकांशी चांगले संबंध होते. तो पोलिसांसोबत नेहमी उठबस करायचा. त्यामुळे वाळू माफियांना तो खबरी असल्याचा संशय आला. दोन दिवसांपूर्वी काही लोकांनी त्याचे अपहरण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशचा चुलत भाऊ आणि गावातील हरी कल्याण, सखाराम अर्दाड, हिनाज बाबामिया सय्यद यांनी मिळून हे कृत्य केले. आरोपींनी सुरेशला कुंभारी पिंपळगाव येथे बोलावले. तिथे त्याला बंदूक, कुऱ्हाड आणि चाकूचा धाक दाखवला. त्याचे अपहरण केले आणि विदर्भात नेऊन त्याची हत्या केली.सुरेशचा मृतदेह किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. घनसावंगी पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह सुरेश अर्दाडचाच असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, “सुरेश आणि त्याच्या चुलत भावाचे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांसोबत मागील काही दिवसांपासून खटके उडत होते.” त्याचा चुलत भाऊ सुरेशला नेहमी म्हणायचा, “तू पोलिसांचा खबरी आहे. आमची माहिती तू पोलिसांना देतो.” याच संशयातून सुरेशची हत्या करण्यात आली, असा पोलिसांचा अंदाज आहे.सुरेशचा मृतदेह किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. घनसावंगी पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह सुरेश अर्दाडचाच असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, “सुरेश आणि त्याच्या चुलत भावाचे वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांसोबत मागील काही दिवसांपासून खटके उडत होते.” त्याचा चुलत भाऊ सुरेशला नेहमी म्हणायचा, “तू पोलिसांचा खबरी आहे. आमची माहिती तू पोलिसांना देतो.” याच संशयातून सुरेशची हत्या करण्यात आली, असा पोलिसांचा अंदाज आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.