लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एका निर्दयी बापाने चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने साडीने फाशी देऊन तिची हत्या केली. आरोपी बालाजी राठोड याला गावकऱ्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.चार वर्षीय चिमुकलीने चॉकलेट साठी वडिलांकडे पैसे मागितले यामुळे चिडलेल्या निर्दयी बापाने घरातच मुलीला साडीने फाशी देऊन क्रूरपणे तिचा खून केल्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आला आहे.










