उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी मध्यस्थी केल्याचा गौप्यस्फोट केला. महायुतीमध्ये एकत्र असल्यामुळे फडणवीसांनी समजूत काढण्यास सांगितल्याचे पवारांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांच्या पक्षाकडूनही जागांसाठी निरोप आला होता, पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.










