अश्लील चॅट करुन 25 वर्षीय तरुणाकडून ‘ते’ फोटो मागवले; 50 लाख उकळले, पण ‘ती’ निघाला ‘तो’!

पीडित तरुणाला एका अनोळखी युवतीने व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून संवाद साधण्यास सुरुवात केली. तिने स्वतःला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी म्हणून सादर करत पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला.सोनेगावातील 25 वर्षीय युवकाला सेक्स्टॉर्शनमध्ये अडकवून 50 लाखांनी गंडा घातल्या प्रकरणात सायबर पोलिसांनी बिहारच्या युवकाला अटक केली आहे. सुंदरकुमार कुंदनकुमार सिंग, वय 20 वर्ष, रा. पूर्णिया, असे अटकेतील युवकाचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे आरोपी दहावी नापास असूनही, तो इंटरनेटच्या वापरात इतका पारंगत आहे की अशा गुन्ह्यांची योजनाबद्ध आखणी करत होता.

जानेवारी महिन्यात पीडित तरुणाला एका अनोळखी युवतीने व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून संवाद साधण्यास सुरुवात केली. तिने स्वतःला दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी म्हणून सादर करत पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संभाषण झाले आणि काही दिवसांतच अश्लील चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर आरोपीने बनावट युवतीच्या नावाने अश्लील फोटो व व्हिडिओ शेअर करून पीडित तरुणा कडून देखील असेच फोटो पाठवण्यास सांगितले. जेव्हा पीडिताने असे फोटो शेअर केले, त्यानंतर त्याचा वापर करून ब्लॅकमेलिंग सुरू झाली.युवक एका बड्या कंपनीत काम करतो. जानेवारी महिन्यात तरुणीने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मी मूळ गोरखपूर येथील रहिवासी असून, दिल्ली विद्यापीठात शिकत असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने त्याचा विश्वास संपादन केला. त्याच्यासोबत व्हॉटसअपवर चॅट करायला लागली.या दरम्यान तिचे आक्षेपार्ह छायाचित्र युवकाला पाठविले. युवकानेही तिला स्वत:ची आक्षेपार्ह छायाचित्र पाठवली. ती व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने वेळोवळी युवकाकडून 49 लाख 34 हजार 286 रुपये उकळले. फसवणूक झाल्याने युवकाने सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 4 मे रोजी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराच्या विरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या न्वये गुन्हा दाखल केला.सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला सुंदरकुमार या रॅकेटचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचे पथक बिहारला गेले. सुंदरकुमारला अटक करून नागपुरात आणले. त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.