आगामी विधानसभेला आपल्या विकासकामांचा व महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा आधारे सामोरे जा – आमदार चिमणराव पाटील

आगामी विधानसभेला आपल्या विकासकामांचा व महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा आधारे सामोरे जा – आमदार चिमणराव पाटील

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पारोळा – आगामी विधानसभेची निवडणुकीचा अनुषंगाने शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडींची विस्तृत बैठक शहरातील विजया लॉन येथे आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व दि.जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सर्वप्रथम दिपप्रज्वलन, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून वंदन करण्यात आले, हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन करण्यात आले. या बैठकीचे सुत्रसंचलन मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणाल महाजन यांनी केले, प्रस्तावना शिवसेना सोशल मिडिया विभागाचे प्रमुख योगेश्वर पुरोहीत यांनी केले. अमोल पाटील यांनी मुख्य प्रस्तावना करतांना बुथ स्तरावर करावयाचे नियोजन,

एरंडोल विधानसभेत सुरू असलेल्या विकासकामांचा लेखाजोखा, महायुती सरकारने महिला, युवक, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध योजना यांसह अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. एरंडोल शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवि जाधव, शिवसेना एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे यांनी मनोगत व्यक्त केले. तर मुख्य मार्गदर्शन आमदार चिमणरावजी पाटील यांनी केले. या बैठकीला राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभुराजजी देसाई  यांनी दुरध्वनीव्दारे संबोधित केले. यासमयी एरंडोल विधानसभेच्या महायुतीच्या समन्वयकपदी जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, एरंडोल शहरप्रमुखपदी एरंडोल नगरपरिषदेचे नगरसेवक नितीन चैत्राम चौधरी (बबलु पहेलवान), एरंडोल शहरप्रमुख (पुराभाग) शहरप्रमुखपदी अतुल सुभाष मराठे, मागासवर्गीय सेनेचे शहरप्रमुख अमोल किशोर तंबोली, पारोळा युवासेनेचा शहरप्रमुखपदी अमोल मराठे यांची नियुक्ति करण्यात आली.

यासमयी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गालापुर येथील सचिन महाजन, वनकोठे प्रकाश बोरसे, एरंडोल येथील पंकज चौधरी, उत्राण सरपंच राजु पाटील, चोरवड येथील उपसरपंच विजय भीमराव पाटील, चोरवड येथील उपसरपंच निंबा रतन पाटील, चोरवड येथील उपसरपंच किरण जिजाबराव पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील व अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे संचालक चतुर पाटील, जिजाबरावबापु पाटील, पोपटआण्णा चव्हाण, जिल्हा दुध संघाचे संचालक दगडु चौधरी, रावसाहेब भोसले, धरणगांव बाजार समितीचे सभापती शालिक गायकवाड, जिल्हा बँकेचे मा.संचालक डॉ.सतिष देवकर, पं.स.सभापती अनिल महाजन, गबाजीआण्णा पाटील, धरणगांव बाजार समितीचे उपसभापती किरणदादा पाटील, संचालक देविदास चौधरी , पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष विजु पाटील, उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, नगराध्यक्ष दयाराम पाटील, एरंडोल तालुकासंघटक संभा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, पारोळा युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, पारोळा नगरपरिषदेचे नगरसेवक मनोज जगदाळे, एरंडोल व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख परेश बिर्ला, एरंडोल युवासेनेचे शहरप्रमुख कृष्णा ओतारी, शेतकी संघाचे संचालक नथाबापु पाटील, पारोळा शहरप्रमुख अमृत चौधरी, धरणगांव बाजार समितीचे संचालक गजाननबापु पाटील, कासोदा सरपंच महेश पांडे, धुळपिंप्री सरपंच संजुआबा पाटील, खेडी येथील पन्ना सोनवणे, आडगांव उपसरपंच डि.एन.पाटील , आमडदे येथील संभाजी भोसले, वनकोठे येथील नंदु मोहीते, एरंडोल शहरसंघटक मयुर महाजन, आनंदनगर येथील देशमुख राठोड यांसह सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडींचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, प्रत्येक गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रत्येक गावातील विविध कार्यकारी सोसायटींचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, प्रत्येक गावातील बुथचे बुथप्रमुख, शिवदुत, सदस्य व मोठ्या संख्येने माता-भगिणी व प्रत्येक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.