गुजरातमध्ये भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला आपचा धक्का, दिल्लीतील पराभवानंतर पक्षाला नवसंजीवनी.

दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीने पंजाब आणि गुजरात पोटनिवडणुकीत जोरदार पुनरागमन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी या विजयानंतर भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला असून, जनतेने दोघांनाही नाकारल्याचे म्हटले आहे.दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाची अवस्था बिकट झाली आहे असे बोलले जात होते. पण राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आप ने कमबॅक केले आहे. पंजाबमध्ये आपने जोरदार विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. गुजरातमध्ये विसावदर सीटवर आपने विजय मिळवून भाजपची चिंता वाढवली आहे. या दोन जागांवर मिळालेला विजय आपसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

दिल्लीत हरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे राजकारण आता संपले, असे म्हटले जात होते. पण त्यांनी जोरदार पुनरागमन केले आहे. दिल्लीतील पराभवानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात, गुजरातमध्ये आपनेने जागा जिंकणे आश्चर्यकारक आहे. या विजयामुळे आपकडून स्थानिक पातळीवर काम केले जात असल्याचे दिसते.पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपचा विजय झाला आहे. आपचे उमेदवार संजीव अरोड़ा यांनी काँग्रेसचे भारत भूषण आशु यांचा 10637 मतांनी पराभव केला.गुजरातच्या विसावदर विधानसभा जागेवर आपचे गोपाल इटालिया जिंकले. त्यांना एकूण 75942 मते मिळाली. त्यांनी भाजपचे किरीट पटेल यांचा 17554 मतांनी पराभव केला. तर, गुजरातच्या कडी सीटवर भाजपचे राजेंद्र चावड़ा 39452 मतांनी जिंकले. त्यांनी काँग्रेसचे के. रमेश चावड़ा यांचा पराभव केला.

रमेश चावड़ा यांना 60290 मते मिळाली.अरविंद केजरीवाल यांनी या विजयानंतर भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. त्यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये ते म्हणाले, “गुजरातच्या विसावदर आणि पंजाबच्या लुधियाना पश्चिम सीटवर आम आदमी पार्टीच्या शानदार विजयाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. गुजरात आणि पंजाबच्या लोकांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. दोन्ही ठिकाणी मागच्या निवडणुकीपेक्षा जवळपास दुप्पट मतांनी विजय झाला आहे.” केजरीवाल पुढे म्हणाले, “हे दाखवते की पंजाबचे लोक आमच्या सरकारच्या कामामुळे खूप खुश आहेत. त्यांनी 2022 पेक्षा जास्त मतं दिली आहेत. गुजरातची जनता आता भाजपमुळे त्रस्त झाली आहे. त्यांना आम आदमी पक्षात आशा दिसत आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप, दोन्ही पक्ष एकत्रित लढले. या दोघांचा एकच उद्देश होता – ‘आप’ला हरवणे. पण लोकांनी दोन्ही ठिकाणी या दोन्ही पक्षांना नाकारले.”

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.