पांढरी गाडी, चपला अन्… जुन्नरमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि कॉलेज तरुणीची बॉडी सापडली.

रामचंद्र साहेबराव पारधी, वय 40 वर्ष, आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन युवती रुपाली संतोष खुटाण अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत तरुण आणि तरुणी अशा दोघा जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मयतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे.

रामचंद्र साहेबराव पारधी, वय 40 वर्ष, आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन युवती रुपाली संतोष खुटाण अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत जुन्नर पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली आहे. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र पारधी हे मूळ दुर्गावाडीचे असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते, याबाबत त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. याशिवाय रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.स्थानिक ग्रामस्थांना जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे दिसले. यानंतर शोध घेतला असता, कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळल्या. रविवार दिनांक 22 जून रोजी दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबले. सोमवारी 23 तारखेला सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून शोध घेतला, तेव्हा रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.जुन्नर रेस्क्यू टीमचे रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, आणि पोलिस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे, दादा पावडे यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलिस करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.