इराणची अमेरिकेला थेट मोठी धमकी; युद्धाची सुरुवात तुम्ही केली, आम्ही संपवणार…

अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर बॉम्ब टाकल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने थेट युद्धात सहभाग घेतल्याने रशिया, चीन आणि पाकिस्तानने अमेरिकेचा निषेध केला आहे. अमेरिकेने इराण च्या अणु ठिकाणांवर बॉम्ब टाकल्याने तणाव वाढला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध ताणले गेले असून दोन्ही बाजूंनी लढाई सुरू आहे. अमेरिकेने थेट या युद्धात उडी घेतलीये. इराणच्या अणु ठिकाणांवर अमेरिकेने बॉम्ब टाकल्याने रशिया, चीन आणि पाकिस्तानने निषेध केलाय. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत. अमेरिका आता इस्रायलला केवळ गुप्त माहितीच नाही, तर लष्करी मदतही पुरवत आहे. भारतासाठी ही एकप्रकारे कठीण परिस्थिती आहे, कारण इस्रायल आणि इराण या दोघांशीही चांगले संबंध भारताचे आहेत.

इराणचा थेट अमेरिकेला मोठा इशारा अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर बॉम्ब टाकल्याने आता इराणनेही थेट इशारा अमेरिकेला दिलाय. तुम्ही सुरू केले आम्ही संपवणार म्हणत इराणने अमेरिकेला मोठी धमकी दिलीये. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराण सैन्याकडून एक मोठे विधान समोर आले आहे. इराण सैन्याच्या प्रवक्त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट जुगारी म्हटले आणि म्हटले की, तुम्ही हे युद्ध सुरू करू शकता, पण आम्ही ते संपवू, असे म्हटले आहे.इराणवरील हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना मध्य पूर्वेतील अनेक देश सोडण्यास सांगितले आहे. यामुळे हा तणाव वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. इराणच्या अणुस्थळांवर बॉम्बस्फोटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर अमेरिकेने लेबनॉन, सीरिया, कतार, जॉर्डनसह अनेक देशांमधील आपल्या दूतावासांद्वारे सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकेनेही इराणला इशारा देत खबरदार हल्ले करण्याचा विचारही करू नका, असे म्हटले.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचे समर्थन करताना युनायटेड किंग्डम आणि इस्रायलने म्हटले की, इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. इस्रायलकडून या बैठकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानण्यात आले. ज्यावेळी दुसरे देश मदत करण्यास पुढे येत नव्हते, त्यावेळी अमेरिका थेट युद्धात उतरले. रशिया, चीन आणि पाकिस्तान यांनी थेट इराणचे समर्थन करत पाकिस्तानच्या कारवाईचा निषेध केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.