सुरूवातीला सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर ओंकार, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा यासारख्या योगक्रियांनी मन, आत्मा आणि शरीर यांच्यात समन्वय साधण्याचा अनुभव सहकाऱ्यांनी घेतला. ‘जैन भूमिपुत्र’च्या संपादकीय विभागाचे सहकारी किशोर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. मोनिका भावसार यांनी ‘आहार, आरोग्य आणि जीवनशैली’ याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मानवसंसाधन विभागाचे वरिष्ठ सहकारी जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, भिकेश जोशी, वैभव चौधरी, सुचेत जैन, आर. डी. पाटील, चंद्रकांत चौधरी, अजय काबरा, ईश्वरसिंग पाटील, दिनेश चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. जैन प्लास्टिक पार्कला स्वास्थापूर्ण आरोग्यासाठी योग करण्याचा संकल्प स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी ‘योग आणि आहार’ अशा जीवनशैलीत बदल करण्याचा संकल्प करत प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांनी योग दिन साजरा केला. सूर्यगिरीजी अर्थात सुभाष जाखेटे यांनी योगाभ्यास करुन घेतला. ओमकार मंत्राने सुरवात झाली. तितली आसन, भ्रामरी प्राणायामाद्वारे गुंजन, पद्मासन, वज्रासनसह अन्य योगाभ्यास करीत भारतीय संस्कृतीने जगाला योग दिल्याचे त्यांनी सांगितले. पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक यांनी सुभाष जाखेटे यांचे स्वागत केले. कंपनीमधील प्रत्येक सहकाऱ्याचे आरोग्य हे उत्तम रहावे या भावनेतून मोठ्याभाऊंनी सुरू केलेला योगाभ्यास वर्ग नियमीत होत असतात, अनेक सहकारी त्याचा लाभ घेत असल्याचे त्यांनी म्हटले. किशोर बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानेश पाटील, अनिल जैन यांच्यासह कार्मिक विभागाच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. हायटेक प्लॉट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा योगशिक्षका कमलेश शर्मा यांनी हायटेक प्लॉट फॅक्टरीमधील महीला सहकाऱ्यांकडून योगाभ्यास करून घेतला. यावेळी डॉ. कल्याणी मोहरीर व विजयसिंग पाटील यांनी योगशिक्षिका कमलेश शर्मा यांचे स्वागत केले. बैठे कामांमुळे महिलांमध्ये होणाऱ्या व्याधींना दूर करण्यासाठी असणारी योगासने त्यांनी समजून सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयसिंग पाटील, पर्सोनेल विभागाचे सहकारी एस.बी. ठाकरे, मनोहर पाटील आणि डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. अश्विनी पाटील, प्रवीण पगारिया, प्रशांत चौधरी यांनी परिश्रम घेतले. अनुभूती निवासी स्कूल मध्ये सकाळी ६ ते ७ यावेळेत विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. डॉ. स्नेहल फेगडे यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. मानसिक व शारिरीक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व तसेच एकाग्रतेसाठी विद्यार्थ्यांनी योग का करावे हे समजून सांगितले. योगमंत्राने कार्यक्रमाची सुरवात झाली. यानंतर विविध प्रात्याक्षिके करण्यात आली.दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…
