मित्र धबधब्यावर गेले, जुना वाद उफाळला अन् दोस्तालाच संपवलं, नवी मुंबईतील खळबळजनक घटना.

नवी मुंबईतील मित्रानेच धबधब्याजवळ रागाच्या भरात मित्राची हत्या केली. जुन्या वादामुळे हत्त्या झाल्याचे समोर येत आहे. आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. जुन्या वादामुळे सुरेश दुनू होनहागा( वय २० वर्षे, रा. ठि. आजवानी कॉरी, रुचित हॉटेल जवळ, महापे, नवी मुंबई) याने आपल्या मित्र संजय प्रकाश बेहरा (वय २२ वर्षे, रा. ठि. आजवानी कॉरी, रुचित हॉटेल जवळ, महापे, नवी मुंबई.) याच्या गळ्यावर हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची घटना दि. १६/०६/२०२५ रोजी बावकुळेश्वर मंदिराच्या पाठीमागील डोंगरातील जंगलाच्या धबधब्याच्या खाली घडली. याबाबतची फिर्याद संजय बेहरा याची बहीण मनिषा राहुल केतवाल (वय १९ वर्षे, रा.ठी. मु.पो. आजिवली, आजिवली हायस्कूल जवळ, पनवेल) यांनी तुर्भे पोलिस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मृत संजय प्रकाश बेहरा ( वय २२) व त्याची हत्या करणारा आरोपी सुरेश दुनू होनहागा ( वय २०) हे दोघेही महापे येथील आजवानी कॉरीजवळ राहत होते आणि दोघेही मित्र होते. सोमवारी १६/०६/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या हे दोघे मित्र पावसाळ्यामुळे तुर्भे एमआयडीसीतील डोंगराळ भागातील धबधब्याच्या ओढ्यामधील खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी या दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादामुळे आरोपी सुरेश याने संजयच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. यात संजय गंभीर जखमी होऊन त्याच ठिकाणी पडल्यानंतर सुरेशने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निघृणपणे हत्या केली.त्यानंतर काहीही झाले नसल्याचे भासवत तो रात्री झोपी गेला. दरम्यान, सुरेश आणि संजय या दोघांना सोबत जाताना त्याच्या कुटुंबीयांनी पाहिले होते, त्यामुळे या हत्या प्रकरणात आपले नाव उघड होईल. त्यानंतर पोलिस आपल्याला पकडतील अशी भीती सुरेशच्या मनामध्ये निर्माण झाली. त्‍यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून संजयची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यासोबत तुर्भे एमआयडीसीतील डोंगराळ भागात जाऊन मृत संजयचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी सुरेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.याबाबत अधिक तपास तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेश कोंडाळकरकरीत आहेत

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.