बेपत्ता पोलिसाची बॉडी घाटकोपर स्कायवॉकवर सापडली; बायको म्हणाली, विलास 11 तारखेला बाहेर पडले ते…

नायगाव पोलिस मुख्यालयात सशस्त्र दलात नेमणूकीला असलेले विलास राजे हे घाटकोपरच्या पोलिस कॉलनीमध्ये वास्तव्यास होते.मुंबईतून बेपत्ता असलेल्या पोलिसाचा घाटकोपरच्या स्कायवॉकवर मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हवालदार विलास राजे असे या पोलिसाचे नाव असून ते 11 जूनपासून बेपत्ता होते. दारूच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.नायगाव पोलिस मुख्यालयात सशस्त्र दलात नेमणूकीला असलेले विलास राजे हे घाटकोपरच्या पोलिस कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. 11 जूनला घरातून बाहेर पडल्यानंतर राजे पुन्हा परतलेच नाही. त्यांच्या पत्नीने याबाबत बेपत्ता झाल्याची तक्रार पंतनगर पोलिस ठाण्यात केली होती.राजे यांचा पोलिसांकडून शोध सुरू असताना गुरूवारी घाटकोपर पूर्वेकडील स्कायवॉकवर ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. पंतनगर पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले.

मात्र दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.विलास राजे यांना दारु पिण्याचे व्यसन असल्याने ते घरी नियमित येत नसत. त्याचप्रमाणे फेब्रुवारीपासून ते कर्तव्यावर देखील जात नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत पंतनगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.दुसरीकडे, अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील पुष्पावती नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत उदापूरच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि माजी सरपंच पांडुरंग सहदेव शिंदे, वय 76 वर्षे, यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. शिंदे बनकर फाटा येथून उदापूरकडे येत होते. त्या वेळी ही दुर्घटना घडली. आदर्श सरपंच म्हणून त्यांचा गौरव झाला होता.

दरम्यान, कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. याच रस्त्यावर विजयनगर परिसरात शुक्रवारी डम्परला ओव्हरटेक करताना एका दुचाकीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या सिलिंडरच्या गाडीला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार छोटू चव्हाण डम्परच्या चाकाखाली फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.छोटू चव्हाण हा तरुण आपल्या दुचाकीवरून लिंक रोडवरून येत होता. विजय नगर परिसरात त्याने डम्परला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याची दुचाकी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गॅसच्या टेम्पोला धडकली आणि तो डम्परच्या चाकाखाली फेकला गेला. त्याच्या दुचाकीवर निखिल करपे या तरुणाची दुचाकी आदळली. त्यामुळे निखिल हा गाडीवरून खाली पडल्याने जखमी झाला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.