मर्सिडीजची धडक, नवी मुंबईत विवाहितेचा मृत्यू, 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी ताब्यात.

बुधवारी सायंकाळी 7 वाजता गोपाल यादव आणि रेखा हे दोघे पती-पत्नी स्कूटरवरुन नवीन पनवेल येथे परत येत असताना अपघात झाला.मुंबईहून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा मृत्यू ओढवला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री नवी मुंबईतील शीव-पनवेल मार्गावर खारघर परिसरातील हिरानंदानी ब्रिजजवळ घडली.
खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या 19 वर्षीय मर्सिडीज कार चालक तरुणीला ताब्यात घेतले आहे. तिथी सिंग असे तिचे नाव असून ती नवीन पनवेल भागातील रहिवासी आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातातील मरण पावलेल्या महिलेचे नाव रेखा यादव, वय 42 वर्ष, असे आहे. तर जखमी झालेल्या तिच्या पतीचे नाव गोपाल यादव, वय 54 वर्ष, असे आहे. यादव दाम्पत्य नवीन पनवेलमधील देवद भागात कुटुंबीयांसह राहण्यास आहेत. रेखा यादव या घाटकोपर पंत नगर येथील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या.बुधवारी सायंकाळी 7 वाजता गोपाल यादव आणि रेखा हे दोघे पती-पत्नी स्कूटरवरुन नवीन पनवेल येथे परत येत होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कूटर शीव-पनवेल मार्गावरील खारघर येथील हिरानंदनी पूल उतरुन पुढे जात होती.

याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज बेंझ कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. त्यामुळे स्कूटरवरील यादव दाम्पत्य खाली पडले.इतर वाहन चालकांनी जखमी गोपाल व त्यांची पत्नी रेखा या दोघांना बाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केले. या घटनेने यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघाताला जबाबदार असलेली मर्सिडीज कार चालवणारी 19 वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी तीर्था सिंह हिला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.