नागपूरची दिव्या देशमुख बनली भारताची चेस क्वीन, वर्ल्ड नंबर 1 ला हरवलं, PM मोदींकडून कौतुकाची थाप.

लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने महिला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केले.भारताची ‘चेस क्वीन’ अशी ओळख असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखच्या कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या जागतिक टीम रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने महिला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केले.जागतिक ज्युनियर क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिव्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. या स्पर्धेत दिव्याने एकूण तीन बक्षिसे पटकावली. दिव्याच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ‘एक्स’वर या सामन्याची छायाचित्रे शेअर करीत तिचे कौतुक केले.

‘दिव्याच्या यशातून तिची जिद्द आणि दृढनिश्चय दिसून येतो. तिची कामगिरी देशातील अनेक युवा बुद्धिबळपटूंनाही प्रेरणा देणारी ठरेल. तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,’ असे पंतप्रधानांनी या संदेशात म्हटले आहे.वुमन ग्रॅण्डमास्टर असलेल्या १९ वर्षीय दिव्याने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील उपांत्य सामन्यात उत्कृष्ट व आक्रमक चाली खेळून सर्वांना आश्चर्यचकित कामगिरी केली. दिव्याने ७४ चालींमध्ये तीन वेळा ‘ वर्ल्ड चॅम्पियन ‘ राहिलेल्या यिफानला पराभूत केले. मात्र, निर्णायक लढतीत दिव्याचा उझबेकिस्तानची महिला फिडेमास्टर निलोफरखान इमोमकुझिव्हाने पराभव केला.गेल्या वर्षी बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दिव्याचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते.

त्यानंतर दिल्ली येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभातही मोदींनी दिव्याचे कौतुक केले होते.काही दिवसांपूर्वी भारताचा युवा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश याने नॉर्वे चेस स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते. दिव्या आणि यिफान यांच्यातील हा सामना पाहणाऱ्यांना गुकेश आणि कार्लनसची पुन्हा आठवण झाली. या सामन्याच्या शेवटच्या टप्यात विहानकडून एक छोटीशी चूक झाली. तिने आपला पराभव मान्य केला आणि हस्तांदोलनासाठी दिव्यापुढे आपला हात पुढे केला. यिफानच्या या कृतीवर पहिल्यांदा दिव्याचा विश्वासच बसला नाही. काही क्षण तिने डोळे मिटले. काहीशी भावुक झाली आणि यिफानशी हस्तांदोलन केले. आपली चूक खिलाडूवृत्तीने कबूल करीत यिफानने स्मितहास्य केले आणि ती निघून गेली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.