क्रिकेट खेळून 6 मित्र समुद्रात पोहायला; ‘ती’ इच्छा अखेरची ठरली, डोळ्यांदेखत दोस्त गमावला.

समुद्र किनारी क्रिकेट खेळायला गेलेल्या सहा मित्रांपैकी एका १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. समुद्राला भरती असल्याने बचावकार्यात अडथळे आले, पोलिसांनी ओहोटीनंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्याची माहिती दिली.समुद्रकिनारी क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी एका 17 वर्षीय तरुण मुलगा समुद्रात बुडाल्याची घटना सातपाटी परिसरात घडली आहे. उमेद इमरान शेख असे मृत मुलाचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे मुस्लिम मोहल्ला परिसरातून सहा मुले समुद्रकिनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेली होती. क्रिकेट खेळून झाल्यानंतर समुद्रात पोहण्याची इच्छा झाल्याने हे सहा मित्र समुद्रात पोहण्यासाठी उतरले. या सहा मित्रांपैकी उमेद इमरान शेख हा सतरा वर्षाचा तरुण मुलगा समुद्राच्या विशालकाय लाटांच्या विळख्यात आल्यानेसमुद्रात बुडाला. यावेळी त्याच्यासोबत समुद्रात होण्यासाठी उतरलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यात यश आले नाही.

उमेद सोबत समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले त्याचे पाच मित्र त्यानंतर वेळी समुद्रातून बाहेर पडल्याने बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातपाटी पोलीस आणि स्थानिक मच्छीमार घटनास्थळी दाखल झाले. स्वच्छवारांच्या मदतीने पोलिसांनी समुद्रात बुडालेल्या उमेद शेख याचा शोध सुरू केला. जिल्ह्यात सध्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत असून समुद्राला देखील भरती आल्याने उधाण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. समुद्राच्या मोठमोठ्या लाटांमुळे उमेदचा शोध घेण्यात अडथळे निर्माण झाले तब्बल चार तास शोध मोहीम राबवून देखील त्याचा शोध घेण्यात यश आले नाही. त्यानंतर हि शोध मोहीम थांबवण्यात आली. समुद्राला ओहोटी आल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.रायगडमधील चौक परिसरात पावसाळी पर्यटन करताना एका तरुणाचा बळी गेला. नढाळमधील इर्शाळवाडी गावाच्या पायथ्याशी असलेल्या पळसाई धरणात बुडून भोलाकुमार सहानी याचा मृत्यू झाला आहे.

रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पांडुरंग कांबळे, आनंद हांडा, ओमकार मचले, भोलाकुमार सहानी असे चौघे जण पळसाई धरणावर मौजमजा करण्यासाठी आले होते. यात भोला कुमार सहानी रा. नवीन पोसरी, ता. खालापूर याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडू लागला आणि काहीच वेळात पाण्यात दिसेनासा झाला. यासंबंधी माहिती मिळताच स्थानिक नागरिक अमित जाधव याने सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील सोनटक्के यांना दिली. त्यांनी चौक पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, खोपोलीतील हेल्प फाऊंडेशन यांना याबाबत माहिती दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.