इराणच्या एकमेव अणुप्रकल्पावर इस्रायलकडून हल्ला; दोन्ही देशांतील संघर्ष गंभीर वळणावर, हल्ले सुरुच.

 इराणसोबत शुक्रवारी जीनिव्हा येथे युरोपियन महासंघाचे वरिष्ठ मुत्सद्दी अणुप्रकल्पाबाबत चर्चा करणार आहेत. बैठकीसाठी जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनचे मुत्सद्दी एकत्र येणार आहेत.इराणमधील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बशर येथील प्रकल्पावर हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्रायलने शुक्रवारी दिली. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने गंभीर वळण घेतल्याचे समोर आले आहे.इस्रायलने गेल्या आठवड्यात हल्ले सुरू केल्यापासून इराणच्या अनेक आण्विक तळांवर हल्ले केले आहेत; पण इराणच्या अरब आखाती शेजारी असलेल्या आणि रशियातील तंत्रज्ञांना रोजगार देणाऱ्या बशर प्रकल्पावर हल्ला करणे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. इस्रायलच्या लष्कराच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले, की लष्कराने बशर, इस्फहान आणि नतान्झ येथील अणुकेंद्रांवर हल्ले केले आहेत आणि अतिरिक्त तळांना लक्ष्य केले आहे.इराणबाबत पुढील पावले उचलताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पेंटागॉन विविध पर्याय उपलब्ध करून देत आहे; परंतु याबाबत कोणतीही माहिती आता दिली जाणार नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी बुधवारी सिनेटरना याबाबत माहिती दिली.इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी जिवंत राहू शकत नाहीत, असा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी गुरुवारी दिला. इराणच्या क्षेपणास्त्रांच्या ताज्या हल्ल्यात रुग्णालयावर हल्ला करण्यात आला. त्यात किमान ४० जण जखमी झाल्यानंतर काट्झ यांनी हा इशारा दिला. इराणसारख्या देशाचे नेतृत्व करणारा आणि इस्रायलचा विध्वंस हे आपले ध्येय बनवणारा खामेनी यांच्यासारखा हुकूमशहा जिवंत राहू शकत नाही, असे काट्झ म्हणाले.इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता भारताने इस्रायलमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलमधून भारतात आणण्यासाठी संबंधितांना रस्ता मार्गे आणि त्यानंतर हवाई मार्गाने भारतात येण्याची सोय केली जाणार आहे.

संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने भारताने बुधवारी इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू करण्याची घोषणा केली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी इस्रायलला बशर अणुप्रकल्पावरील हवाई हल्ले तात्काळ थांबविण्याचा इशारा दिला. या अणुऊर्जा प्रकल्पात रशियन इंधनाचा वापर केला जातो.इराणसोबत शुक्रवारी जीनिव्हा येथे युरोपियन महासंघाचे वरिष्ठ मुत्सद्दी अणुप्रकल्पाबाबत चर्चा करणार आहेत. बैठकीसाठी जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनचे मुत्सद्दी एकत्र येणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.