येतो मी गौरव बेटा; लेकराला निरोप देऊन बाप निघाला, काही तासातच नकोसा निरोप आला, चिमुरड्याचा तडफडून अंत.

गौरव चेतन वक्टे या चार वर्षांच्या चिमुकलाचा कूलरमधून विजेका धक्का लागल्याने मृत्यू झाला.घरुन निघताना ज्या चिमुकल्याला डोळे भरुन पाहिलं, हसत निरोप दिला, शेतात काम करत असताना त्याच लेकराच्या बाबत क्षणभर विश्वास बसणार नाही असा निरोप आला. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून जवळच असलेल्या वडाळी येथील चार वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेळताना कूलरजवळ गेलेला चिमुकला विजेचा धक्का लागल्याने जागीच गतप्राण झाला. त्यामुळे वडील शेतामध्ये जाताना मुलाची झालेली भेट अखेरची ठरली.सध्या बळीराजा हा सर्वत्र आपल्या खरीप हंगामाची तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे सकाळपासूनच आपल्या काळ्या मातीत तो राबत आहे. अशावेळ त्याचा एक पाय घरात आणि एक पाय आपल्या शेतामध्ये असल्यासारखं पाहायला मिळतं.बुलढाणा जिल्ह्यातील एका बळीराजावर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.

घरुन निघताना ज्या चिमुकल्याला त्याने डोळे भरुन पाहिलं, शेतात काम करत असताना त्याच्याच मृत्यूचा निरोप ऐकावा लागला.बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून जवळच असलेल्या वडाळी येथील गौरव चेतन वक्टे या चार वर्षांच्या चिमुकलाचा मृत्यू झाला. घरामध्ये खेळत असताना कुलरचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 18 जून रोजी संध्याकाळी अंदाजे सहा ते सात वाजताच्या दरम्यान घडली.वडाळी येथील चेतन नारायण वक्टे हे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची पत्नी घरकाम करत होती, तर लहानगा गौरव घरामध्ये नेहमीप्रमाणे खेळत होता. मात्र नजर चुकवून खेळताना तो नकळत कूलरच्या जवळ गेला. यावेळी इलेक्ट्रिक शॉक लागून तो ओढला गेला.

गौरवला त्वरित नांदुरा येथील शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्यावर वडाळी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वक्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सर्वांच्या नजरेसमोर असणारा, कुणालाही दिसताक्षणी आपुलकीने ओढ लावणारा सदा हसतमुख चिमुकला गौरव असा चटकन निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अनेक वेळा कुलरबाबत सावधता बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात. कूलरमध्ये पाणी टाकताना विद्युत प्रवाह बंद करुन घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले जाते. मात्र क्षणिक हलगर्जी कोणाच्या जीवावर बेतू शकते, याचं उदाहरण समोर आल्याचं बोललं जात आहे. लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.