लग्नाआधी 100 वेळा फोन, संजय वर्मा निघाला सोनमच्या ‘जवळचा’, तपासात भयंकर उलगडा, केसमध्ये उलटफेर.

 राजा रघुवंशीच्या मृत्यूमुळे कोणाला फायदा होणार आहे का, हे शोधण्यासाठी पोलीस काही जणांची चौकशी करत आहेत.राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोन दिवसांपासून एक नवीनच नाव समोर आले होते, ते Sanjay Verma . राजाचा खून केल्याचा आरोप असलेली त्याची पत्नी Sonam Raghuvanshi ही लग्नापूर्वी याच संजय वर्माशी 100 हून अधिक वेळा फोनवर बोलल्याचे तपासात समोर आले होते. अखेर या संजय वर्माचा छडा लागला आहे.खरं तर सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत संगनमत करून राजाला जीवे ठार मारण्यासाठी तीन भाडोत्री मारेकरी सोबत घेतले होते. या प्रकरणी सोनमसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे, मग Who Is Sanjay Verma? हा प्रश्न या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासह सर्वसामान्यांना पडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहरा येथे Raja Raghuvanshi Murder झाला होता. या प्रकरणात सोनम रघुवंशी , राज कुशवाह आणि तिघा आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपासाला गती दिली आहे. पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे एसपी विवेक सीएम यांनी सांगितले की, “सोनमने राजाशी लग्न करण्यापूर्वी संजय वर्मा नावाच्या व्यक्तीला 100 हून अधिक फोन केले होते.

लग्नानंतरही तिने त्याला फोन करणे सुरु ठेवले.”पोलिसांनी सांगितले की, संजय वर्मा हा दुसरा-तिसरा कोणी नसून राज कुशवाहच आहे. त्यानेच राजाच्या हत्येचा कट रचला होता. एसपी पुढे म्हणाले, “आमचे पथक इंदौरमध्ये आहे आणि राजाच्या मृत्यूमुळे कोणाला फायदा होणार आहे का, हे शोधण्यासाठी काही जणांची चौकशी करत आहे.”दरम्यान, आरोपी सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद याने सांगितले की, त्याला संजय वर्मा नावाच्या कोणाबद्दलही माहिती नाही. तो म्हणाला, “मला संजय वर्माबद्दल काहीही माहिती नाही. राज कुशवाह जिथे काम करायचा ती जागा मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतो. इथून काहीही जप्त केलेले नाही. मला संजयबद्दल काहीही माहिती नाही. संजयचे नावही यात येत आहे, हे मला आजच समजले.”दरम्यान, राजा रघुवंशी याच्या हत्येमागे केवळ प्रेमाचा त्रिकोणच नव्हे, तर आर्थिक कारणही आहे का, याचा तपास एसआयटी करत आहे.

पूर्व खासी हिल्सचे एसपी रितुराज रवी यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर राजा रघुवंशीला मारण्यात यश मिळवले. “यापूर्वी गुवाहाटी, नोंग्रियाट आणि वेईसावदोंग धबधब्याजवळही प्रयत्न झाले होते,” असे ते म्हणाले.राज कुशवाह हा हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे मानले जाते. संशय येऊ नये म्हणून तो मेघालयला गेला नाही. तो सोनम रघुवंशीच्या कुटुंबाच्या कंपनीत काम करतो.राजा रघुवंशी आणि सोहम यांचे 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले होते. 20 मे रोजी ते हनीमूनसाठी मेघालयला गेले होते. 23 मे रोजी सोहरा परिसरातून ते बेपत्ता झाले. 2 जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सांगितले की, सोनमने सोहरा येथील होमस्टेमध्ये तिचे मंगळसूत्र आणि अंगठी ट्रॉली बॅगमध्ये सोडली होती, त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. हत्येनंतर सोनम आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमार्गे इंदौरला पोहोचली.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.