‘माझ्या दुकानामागे का लघवी केलीस रे?’; काही क्षणात वाद पेटला अन् होत्याचं नव्हतं झालं, छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाचा लघुशंकेवरून झालेल्या वादातून खून झाला. मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ नितीन संकपाळ नावाच्या व्यक्तीवर चिकन शॉपच्या कोयत्याने वार करण्यात आले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाचा खून झाला आहे. लघुशंका केल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात एका व्यक्तीने चिकन शॉपच्या कोयत्याने वार केले. यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

नितीन सोनाजी संकपाळ (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो राज नगर, मुकुंदवाडी येथे राहायचा. सचिन सोनाजी संकपाळ (वय ३२) आणि दत्ता बालाजी जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. पुरेशी चिकन शॉपमधील कामगार मस्तान कुरेशी उर्फ मन्ना भाई (रा. न्याय नगर) आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि सचिन हे दोघे भाऊ आहेत. ते मित्र दत्ता जाधव यांच्यासोबत मुकुंदवाडीतील एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. “अर्धी पार्टी झाल्यानंतर नितीन हॉटेलबाहेर येऊन कुरेशी चिकन शॉपच्या पाठीमागे लघुशंकेसाठी गेला,” असे पोलिसांनी सांगितले.यावेळी चिकन शॉपमधील मन्नाने नितीनला दुकानाजवळ लघुशंका का करतो, असे विचारले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. नितीनसोबत असलेले सचिन आणि दत्ता तिथे आले. त्यानंतर मन्ना आणि त्या तिघांमध्ये हाणामारी झाली. मन्नाने चिकन कापण्यासाठी वापरला जाणारा धारदार कोयता घेतला आणि तिघांवर वार केले.या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. नितीनचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तपास सुरू केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.