जळगाव शहरात पर्यावरणप्रेमी विचारांची रुजवात व्हावी, शहरातील नागरिकांना निसर्गप्रेमाचे भान निर्माण व्हावे आणि पद्मश्री अरण्यऋषी मा. मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा प्रेरणादायी ठसा जनमानसावर उमटावा, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला त्यांचे नाव देण्याची अधिकृत मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्तांकडे आज दिनांक १९ जून २०२५ रोजी करण्यात आली. मा. श्री. चितमपल्ली हे नामवंत पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक, लेखक व पर्यावरण कार्यकर्ते होते.










