साताऱ्यात मुसळधार; अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर – तापोळा रस्ता खचला, वाहतूक विस्कळीत.

साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या संततधारमुळे अनेक धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर – तापोळा रस्ता खचल्याची घटना घडली आहे.

महाबळेश्वर – तापोळा रस्ता मध्यरात्रीच्या अतिवृष्टीमुळे चिखली शेडजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे खचला आहे.रस्ता खचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे.घाट रस्त्यांवर दरडी कोसळले आहेत. डोंगरावरील मातीचा भराव निसटू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे भूस्लखनाच धोका वाढू लागला आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोयना १३३, नवजा १५८, महाबळेश्वर १५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यात पश्चिमेकडे मान्सून पावसाने जोर पकडला आहे. सातारा, वाई, जावली, पाटण, कराड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली.मुसळधार पावसाने दरड कोसण्याची भीती आहे. दरम्यान, जावळी खोऱ्यात तर पावसाची संततधार सुरू असून, कण्हेर, वेण्णा लेक, महू धरणात पाण्याची आवक वाढली आहे.हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात 19 जून रोजी ऑरेंज, तर 20 आणि 21 जून रोजी यलो अलर्ट दिला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.