लेकीची भेट ठरली अखेरची! परतीच्या प्रवासात शेतकऱ्याचा मृत्यू, बैलगाडी थेट पूराच्या पाण्यात घुसलेली.

कैलास कोरडे शिवना टाकळी प्रकल्प अंतर्गत पावलोट क्षेत्रातील हतनूर ते जैतापूर शिवारातील हद्दीलगत वाघ नाल्यातून बैलगाडीसह आपल्या मुलीकडे पळसवाडी येथे गेले होते.तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राच्या पाण्यामध्ये जैतापूर येथील कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६) या शेतकऱ्याचा बैलगाडीसह बुडाल्याची घटना सोमवारी (१६ जून) सांयकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकऱ्यासह एका बैलाचा मृत्यू झाला तर एक बैल वाचला आहे.

मृत कैलास कोरडे शिवना टाकळी प्रकल्प अंतर्गत पावलोट क्षेत्रातील हतनूर ते जैतापूर शिवारातील हद्दीलगत वाघ नाल्यातून बैलगाडीसह आपल्या मुलीकडे पळसवाडी येथे गेले होते. संध्याकाळी कोरडे परत त्याच नाल्यातून येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मोठ्या खड्ड्यात बैलगाडीसह बुडाले. आसपासच्या शेतकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. एका बैलाचे जोते तुटल्याने तो बैल पाण्यातून पोहून बाहेर आला तर दुसरा बैल पाण्यात बुडून मृत्यू पावला. लोकांनी दोर टाकून ट्रॅक्टरच्या साह्याने बाहेर काढली ; मात्र कैलास कोरडे यांचा शोध लागला नव्हता. स्थानिक शेतकऱ्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत पाण्यात कोरडे यांचा शोध घेतला परंतु शोध लागला नाही.कोरडे यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी नदीपात्रात तरंगताना आढळून आला. हतनूर येथील शेतकरी बाळू परांडे व जैतापूर येथील उमेश कोरडे यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंदात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेला पुढील तपास देवगाव रंगारी पोलिस करीत आहे . तालुक्यातील नंद्राबाद येथील नळाचे पाणी भरताना विजेचा धक्का लागून छाया प्रमोद तुपे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी दहाला घडली. नंद्राबाद येथे रविवारी सकाळी दहा वाजता सुमारास नळाला पाणी आले होते. विद्युत पंप जोडून पाणी भरण्याची लगबग होती. वीज प्रवाह विद्युत पंपात उतरल्याने विजेचा धक्का लागून छाया तुपे यांचा जागीच मृत्यू झाला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.