पावसाच्या पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, अल्पवयीन मुलाचा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू, मुंबईच्या वांद्रे परिसरातील घटना.

मुंबईत काल(16 जून) पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरात अनेक दुर्घटना देखील घडल्या. यात अनेक जण जखमी देखील झाले, तर काहींचा मृत्यू देखील झाला. अशीच एक दुर्घटना मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मुंबई बँके जवळील मेट्रो स्थानक परिसरात घडली. पावसाने खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.पुढे आलेल्या माहितीनुसार, फैजान परवेज खान (14 वर्ष) असं पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी पाण्यात बुडालेल्या मुलाला जवळच्या गुरुनानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल पूर्व मृत घोषित केलं. सध्या शव विच्छेदन करण्यासाठी या मुलाचे पार्थिव सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोडवर  पावसाळ्यात सखल भागात असलेल्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी केडीएमसीने सक्शन पंप लावले आहेत .

 कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक , डोंबिवली स्टेशन सह वर्दळीची सात ते आठ ठिकाणे केडीएमसीसीने निश्चित केली आहेत . या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरचे कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने सात ते आठ ठिकाणी सक्षम पंप लावलेत. या ठिकाणी पाणी साचल्यास पंपच्या सहाय्याने त्या ठिकाणचे पाणी काढण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे केडीएमसीने शहरातील इतर सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण 22 सक्शन पंप प्रभाग निहाय तैनात केले आहे . जेणेकरून पावसात कुठेही पाणी साचल्यास तात्काळ त्या भागातील पाण्याचा निचरा होऊ शक्य होईल व नागरिकांना दिलासा मिळेल असे माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली .पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी सक्शन पंप दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईचे काम हाती घेतली . ही कामे 95 टक्के पूर्ण झाल्याचा दावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केला. मात्र गेल्या आठवड्याभरात दिवसभरातून तासभर पडलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवली मधील मुख्य रहदारीच्या चौकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते. मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्याचप्रमाणे वाहन चालकांना मार्गक्रमन करताना तारेवरचे कसरत करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर आता कल्याण डोंबिवली महापालिकेने पाणी साचणारी ठिकाने म्हणजेच कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डोंबिवली स्टेशन परिसर अशी सात ते आठ ठिकाणी निश्चित केले आहेत. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेने सक्शन पंप लावले आहेत. या पंपच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले .त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली शहरातील इतर सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण 22 सक्षम पंप तैनात करण्यात आले असून ते प्रभाग निहाय देण्यात आले आहेत .सखल भागात पाणी साचल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रभाग निहाय सक्शन पंप देण्यात आल्याचे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले .एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांनी तत्काळ प्रभाग निहाय आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.