थोरगव्हाण येथिल डी एस देशमुख विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न: पालकांनी शाळेशी सतत संपर्क ठेवावा:नंदकुमार चौधरी यांचे मत .

थोरगव्हाण तालुका रावेर येथे शाळेचे शैक्षणिक सत्र मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरु झाले असून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सोमवार, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या थाटामाटाने व आनंदाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण आदरणीय संचालक व शालेय समितीचे सदस्य नंदकुमार चौधरी होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले.प्रवेशोत्सव निमित्ताने शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक केले गेलेल्या केळ्याचे खांब, आंब्याची पाने असलेले तोरणे व सुंदर रांगोळीने अधिकच खुलवण्यात आला होता. इयत्ता ५ वी च्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबफुल देवून मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक रविंद्र चौधरी ( गोविंद काकाश्री ), गावचे पोलिस पाटील अरविंद झोपे, पालकसंघाचे संतोष राणे सर, विजय चौधरी आदी मान्यवर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. जे. कुरकुरे यांनी केले. मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी आपल्या दातृत्वातून सर्व विद्यार्थी व उपस्थितांना गोडवा म्हणून जिलेबी वाटप केली . विद्यार्थ्यांनी जिलेबीचा अस्वाद घेतला . नविन विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत व इतर सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत करत या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या व नावियपूर्ण प्रवेशोत्सव कार्यक्रम घडवून आणला नियोजन केले .या कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं, “आज शाळेच्या पहिल्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाचा मला अभिमान वाटतो. “या शैक्षणिक वर्षात देखील 5 वी तील सर्वविद्यार्थ्यांना मोफत दप्तर , शालेय वह्या तसेच शाळेची मोफत बससेवा सुरु असणार असून सर्व विद्यार्थी व पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या वातिने सांगितले. शाळेची बस ही तुमच्या साठी मोफत असून ती नीट सांभाळणे ही सर्वांची जबाबदारी असते. “पालकांनीदेखील शाळेशी संपर्क ठेवून आपल्या मुलांच्या शैक्षणिक वाटचालीचे मार्गदर्शन केले पाहिजे असं आवाहन या निमित्ताने करतो असे सांगितले”कलाशिक्षिक एस बी सपकाळे यांनी सभेसाठी मुख्य दर्शनी फलक लेखन केले . कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ शिक्षक टी. पी. घुले तसेच वाय जे कुरकुरे , एम के पाटील , के एम पाटील , प्रविण चौधरी ,  नयना ज्ञानेश्वर पाटील यांचे सह सर्व शिक्षक बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाचा उत्साह अधिकच वाढवला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.