अहमदाबादमधील विमान क्रॅशनंतर केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केदारनाथमध्ये एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.अहमदाबादमधील विमान अपघाताला तीन दिवस झाले नाहीत तर आणखी एक अपघाताची बातमी समोर आली आहे.उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केदारनाथ जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून यामध्ये पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान क्रॅश झाले. खराब हवामानामुळे हा अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे. डेहराडूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाले, असे उत्तराखंडचे एडीजी लॉ अँड ऑर्डर डॉ. वी. मुरुगेशन यांनी सांगितले.हेलिकॉप्टर अपघाताचे कारण अजून समजू शकलेले नाही. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेत प्रौढ, एक मुलगा आणि पायलट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समजत आहे.

एनडीआरएफ टीम बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.अपघाताच्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या अवशेषांचा ढिग पडलेला आहे.केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही चारधाम यात्रेदरम्यान अनेक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहेत, तसेच काही हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंगही करण्यात आली. याआधीही अनेक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका हेलिकॉप्टरला रस्त्याच्या मधोमध क्रॅश लँडिंग करावी लागली होती. चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर लगेचच एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते, ज्यात अनेक लोकांचा जीव गेला होता.या घटना लक्षात घेऊन केदारनाथ मार्गावरील हेलिकॉप्टरच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. दररोज हेलिकॉप्टरच्या 60 फेऱ्या कमी करण्यात आल्या असून, सरासरी 200 ते 250 फेऱ्या हेलिकॉप्टरद्वारे होतात. डीजीसीएने (DGCA) सतत होणाऱ्या अपघातांनंतर हा निर्णय घेतला.

केदारनाथ मार्गावर डीजीसीएने नियम अधिक कडक केले आहेत. नवीन आदेशानुसार, गुप्तकाशीहून एका तासात 2 हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतील आणि 8 तासांमध्ये एकूण 16 हेलिकॉप्टर उड्डाण करू शकतील.हेलिकॉप्टरच्या फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणांवर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. केदारनाथमध्ये यापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..