मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस, वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान; वीज कोसळून चौघांचा मृत्यू.

मराठवाड्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४९.९ मिमी पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मराठवाड्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. ठिकठिकणी वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू झाला.सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे यश राजू काकडे (वय १४) आणि रोहित राजू काकडे (वय २१) या भावंडांचा मृत्यू झाला. मोढा येथे शेतात अंगावर वीज पडल्याने रंजना बापूराव शिंदे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. पिंपळदरी येथे शिवाजी सतीश गव्हाणे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ जीवन सतीश गव्हाणे गंभीर जखमी झाले आहेत.

 कन्नड तालुक्यात तिघे जखमी झाले असून, एक बैलाचा मृत्यू झाला आहे.मराठवाड्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत म्हणजेच शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ७३.६ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड ६१.२, लातूर ६१.१, जालना ४५.६, हिंगोली ४४.३, छत्रपती संभाजीनगर ४१.१, बीड ३८.७ आणि परभणी ३७.७ अशी जिल्हानिहाय पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतीची आमदार श्रीजया चव्हाण आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शनिवारी पाहणी केली. पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.विभागात पावसाला सुरुवात झाल्यानंतर धरणात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे.

जायकवाडी धरणात २९.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना ३६.८८, येलदरी ५०, सिद्धेश्वर १९.५३, माजलगाव ११.७९, मांजरा २६.७२, पेनगंगा ४३.१२, मानार ४८.७४, निम्न तेरणा ७०.१८, विष्णुपुरी २३.६८ आणि सीना कोळेगाव २९.७७ असा धरणनिहाय पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार आज, रविवारी वादळासह पावसाची शक्यता आहे. येत्या २० जूनपर्यंत मध्यम ते हलका पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.